HomeनांदेडBan on use of Dolby system : नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा...

Ban on use of Dolby system : नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध -NNL

नांदेड| जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 3 ऑक्टोंबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्री पर्यतच्या श्री नवरात्र उत्सव कालावधीत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्‍याही व्‍यक्‍तीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) नुसार डॉल्बी सिस्टीमचा वापर करणेस, चालविण्यास तसेच सदर मिरवणूक/उत्सवादरम्यान लेजर लाइटच्या वापरासही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुणीही व्यक्ती हे डॉल्बी सिस्टीम वापरू / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे.

संबंधीतावर नोटीस बजावून त्‍यांचे म्‍हणने ऐकूण घेण्‍यास पुरेसा अवधी नसल्‍याने आणीबाणीच्‍या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत 26 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्‍यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments