Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Mahila Sakthikaran Abhiyan  : नवा मोंढा मैदानावर १० ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा -NNL

Mahila Sakthikaran Abhiyan : नवा मोंढा मैदानावर १० ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा महिला आनंद मेळावा आता १० ऑक्टोबरला होणार आहे.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा मैदानावर भेट देऊन त्याच ठिकाणी बैठक घेतली. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचे हे आयोजन आहे.मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. ७ ऑक्टोबरला हा मेळावा होणार होता. मात्र तो पुढे गेला असून १० ऑक्टोंबरला होत आहे. आज या संदर्भातील महत्त्वपू...
Collector Abhijit raut : निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने करा – जिल्हाधिकारी -NNL

Collector Abhijit raut : निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने करा – जिल्हाधिकारी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विधानसभा निवडणूक 2024 कामकाजासाठी विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात नोडल अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी नियुक्त्या करण्यात आल्या असून नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांनी निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विषयक अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, नियुक्त नोडल अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती. विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वीपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढविण्...
Honoring the award winners : शिराढोण पत्रकार संघाच्या वतीने शिराढोण परिसरातील पुरस्कार विजेत्यांचा गौरव -NNL

Honoring the award winners : शिराढोण पत्रकार संघाच्या वतीने शिराढोण परिसरातील पुरस्कार विजेत्यांचा गौरव -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर| शिराढोण ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिराढोण ता.कंधार येथील ज्येष्ठ नागरिक तथा सरपंच , ग्रामसेवक , शिक्षक इंजिनिअर यांच्या सह अनेक पदाधिकारी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार सन्मान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पृथ्वी , वायू , जल , आग्नी , आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत ' माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील २२२१८ ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता.यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये शिराढोण ता.कंधार जि.नांदेड येथील ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिराढोण ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक म्हणून ५० लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. शिराढोण ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिराढोण चे सरपंच प्रा.खुशाल पाटील पांडागळे , ग्रामविकास अधिकारी मुंजाळ साहेब , उपसरपंच पांडुरंग पवार ...
Fast unto death for embezzlement inquiry : एकंबा गावातील विकास कामात झालेल्या अपहाराची चौकशीसाठी हिमायतनगर तहसीलपुढे आमरण उपोषण सुरु -NNL

Fast unto death for embezzlement inquiry : एकंबा गावातील विकास कामात झालेल्या अपहाराची चौकशीसाठी हिमायतनगर तहसीलपुढे आमरण उपोषण सुरु -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। एकंबा येथील नळ योजना विहिर, फिल्टर पाणी मशिन, अंगणवाडी साहित्य, अंतर्गत नाल्या व इतर विकास कामे न करता परस्पर सरपंच, उपसरपच, ग्रामसेवक यांनी अभियंताच्या सांगनमताने कागदोपत्री कामे दर्शवून शासनाचा निधी उचलून हडप केला आहे. याची गावकऱ्यांसमक्ष चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करूनही प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्याने आज दिनांक ०७ ऑकटोबर पासून गावातील सुजाण नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केला आहे. जोपर्यंत जनतेसमोर चौकशी केली जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्र गावकर्यांनी घेतला आहे. दरम्यान या उपोषणाला माधवराव पाटील देवसरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामात मोठा अपहार व गैरव्यवहार झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर ...
The march Himayatnagar tehsil : शेकडो दिव्यांग, निराधार, शेतकरी लाभार्थींचा मोर्चा हिमायतनगर तहसीलवर धडकला – NNL

The march Himayatnagar tehsil : शेकडो दिव्यांग, निराधार, शेतकरी लाभार्थींचा मोर्चा हिमायतनगर तहसीलवर धडकला – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| दिव्यांग निराधार आणि शेतकरी यांच्या अडचणी सोडविण्यात होत सलेली टाळाटाळ दूर करून तात्काळ न्याय द्यावा. या मागणीसाठी शेकडो महिला- पुरुष लाभार्थींचा मोर्चा प्रहारचे हदगाव तालुका प्रमुख तथा विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार अनिल कदम यांच्या नेतृत्ववात हिमायतनगर तालुका दंडाधिकारी कार्यालयावर दिनांक ०७ रोजी दुपारी धडकला. यावेळी अनुपस्थित असलेल्या तहसीलदाराच्या खुर्चीला निवेदन लावून कुलूप लावण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या आंदोलकांनी केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन घ्यायला लावल्याने आंदोलनकर्त्यांनी शांततेत निवेदन देऊन तात्काळ मागण्या पूर्ण केल्या नाहीतर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. हिमायतनगर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील दिव्यांग, निराधार आणि शेतकरी यां...
Leave Hadgaon Himayatnagar assembly seat to BJP : 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी जागा हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा -NNL

Leave Hadgaon Himayatnagar assembly seat to BJP : 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी जागा हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोग करत असून, विजयदशमी नंतर आचारसंगीता लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीने आपला उमेदवार कोण हे जाहीर केले नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अश्यातच भाजपच्या शिष्टमंडळाने 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा अशी मागणी केल्याने उमेदवारी कोणाला सुटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1992 पासून महायुती मध्ये शिवसेनेकडे गेलेली हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपाला सोडण्यात यावी. आहि मागणी मुंबई येथे हादगाव हिमायतनगरच्या भाजपा शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानसभा कोर कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपा महाराष्ट्रचे सरचिटणीस संजयजी केणेकर आणि महाराष्ट्रचे सचिव विक्रांतदादा पाटील यांची भेट घेऊन केली आहे. नांदेड ...
Vitthal Rathod got the first gold medal : अंतर महाविद्यालय धावणे स्पर्धेमध्ये प्रथम गोल्ड मेडल विठ्ठल राठोडला मिळाले – NNL

Vitthal Rathod got the first gold medal : अंतर महाविद्यालय धावणे स्पर्धेमध्ये प्रथम गोल्ड मेडल विठ्ठल राठोडला मिळाले – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर| अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेमध्ये रनिंग (धावणे )5000 व 10000 मिटर स्पर्धेमध्ये प्रथम गोल्ड मेडल विठ्ठल आशोक राठोड तसेच अंतर महाविद्यालय क्रीडा खो-खो स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये हु ज.पा. महाविद्यालयास द्वितीय सिल्वर मेडल पारितोषक पटकवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन विभाग खो-खो क्रीडा स्पर्धामध्ये पुरुष व महिला शैक्षणिक वर्ष 2024-25 संपन्न झाले. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम त्याच प्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. व्यंकट माने व डॉ.यशवंत कल्लेपवार तसेच उद्घाटक म्हणून डॉ. भास्कर माने लाभले होते....
Navratrotsav ; श्री बालाजी मंदिर देवस्थान हडकोच्या गंगाळ मधील वड्याला राज्यासह विदेशातही मागणी -NNL

Navratrotsav ; श्री बालाजी मंदिर देवस्थान हडकोच्या गंगाळ मधील वड्याला राज्यासह विदेशातही मागणी -NNL

नांदेड, देश विदेश
नवीन नांदेड। गेल्या चार वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या तिरुपती बालाजी मंदिर येथील प्रसिद्ध असलेल्या वडा प्रसादाला श्री बालाजी मंदिर देवस्थान हडको च्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रसादाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली असून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील व विदेशात येथील स्थायिक भाविक भक्तांनी मागणी केली आहे. नवरात्र महोत्सव निमित्ताने ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान ब्रम्होत्त्सव आयोजित करण्यात आला असुन तिरुपती बालाजी मंदिर तिरूमाला येथील प्रसिद्ध असलेल्या वडा प्रसादाला मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणात मागणी करतात त्याच बरोबर बुंदीलाडूचीही भक्तांना आवड असल्याने त्याची मागणी मोठया प्रमाणात करण्यात आल्या नंतर गेल्या चार वर्षांपासून हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे या प्रसादाला सुरुवात करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भक्त गणांनी मागणी करून गंगाळ मध्ये ह...
Shekharji Mundada : उत्पादन बनविणाऱ्या कंपनीसोबत गोसेवा आयोग करार करणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आ. म. राज्य)  -NNL

Shekharji Mundada : उत्पादन बनविणाऱ्या कंपनीसोबत गोसेवा आयोग करार करणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आ. म. राज्य) -NNL

नांदेड, मराठवाडा, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे| भारतीय गोवंशाला महाराष्ट्र शासनाने नुकतेच "राज्य माता-गोमाता" असा दर्जा दिला असून भारतीय गोवंशाच्या परिपोषणाकरिता रुपये 50 प्रति दिन प्रति गोवंश अनुदान घोषित केले आहे या दोन्ही प्रस्तावांचा पाठपुरावा गोसेवा आयोगाने केला आहे. तसेच भविष्यात गोशाळा स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने शेण व गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील गोशाळांना तांत्रिक व आर्थिक मदत देऊन तयार केलेली उत्पादने गोसेवा आयोगामार्फत विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे पोखरभोसी ता.लोहा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.नुकताच गोवंश निवारा व चारा गोदाम उभारणीसाठी कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शेखरजी मुंदडा हे होते. तर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंड...
Raja Khanderao Deshmukh : एकला चालोरच्या भूमिकेला कंटाळून एकाधिकरशाहीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी..राजा खंडेराव देशमुख काँग्रेसच्या वाटेवर -NNL

Raja Khanderao Deshmukh : एकला चालोरच्या भूमिकेला कंटाळून एकाधिकरशाहीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी..राजा खंडेराव देशमुख काँग्रेसच्या वाटेवर -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| ज्यांचा थेट पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सारख्या दिग्गज राजकीय मंडळी सोबत जवळचे संबंध असलेले आणि एके काळीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जुने घराणे म्हणून ज्यांची ओळख असलेल्या राजे रंगराव देशमुख पळशीकर यांचे सुपुत्र राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या हम बोलेसो कायदा या या भूमिकेला कंटाळून काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला होता. परंतू आता त्याच बड्या नेत्याने काँग्रेसला राम राम करून राज्यसभेची खासदारकी मिळवत भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे भाजपातही परत एकदा हुकूमशाही सुरु झाली, असून इतरांना पुढे जाण्याची संधी नाहीत आणि माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे म्हणत या नेत्याने एका प्रकारे हुकूमशाही कडे वाटचाल सुरु केली असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. यामुळे या अशा एकाधिकिशाहीच्या विळख्यातून बाहेर ...
error: Content is protected !!