हिमायतनगर,अनिल मादसवार। एकंबा येथील नळ योजना विहिर, फिल्टर पाणी मशिन, अंगणवाडी साहित्य, अंतर्गत नाल्या व इतर विकास कामे न करता परस्पर सरपंच, उपसरपच, ग्रामसेवक यांनी अभियंताच्या सांगनमताने कागदोपत्री कामे दर्शवून शासनाचा निधी उचलून हडप केला आहे. याची गावकऱ्यांसमक्ष चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करूनही प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्याने आज दिनांक ०७ ऑकटोबर पासून गावातील सुजाण नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केला आहे. जोपर्यंत जनतेसमोर चौकशी केली जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्र गावकर्यांनी घेतला आहे. दरम्यान या उपोषणाला माधवराव पाटील देवसरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामात मोठा अपहार व गैरव्यवहार झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकर्यांनी संबंधितांना विचारणा केली. मात्र उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याने माहिती घेतली असता ग्रामपंचायतच्या अधिकारी कर्मचारी यांनी राबविलेल्या शासकीय नळ योजना कागदोपत्री बनवून पैसे उचलले असल्याचे निदर्शनं आले आहे. तसेच गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी फिल्टर, अंगणवाडीतील साहित्य, नाल्या बांधकाम यासह सर्व शासकीय योजना कागदोपत्री दाखवून परस्पर रक्कम उचलली आहे. याबाबतचे सर्व पुराव्या साहित्य लेखी तक्रार नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे दिली होती. मात्र अद्यापही या रजःची दाखल घेतली गेली नाही किंवा चौकशी देखील झाली नसल्याने दिनांक ०७ पासून गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आमरण उपोषण सुरु होताच गटविकास अधिकारी जाधव यांनी भेट देऊन उपोषण करू नका आम्ही चौकशी करू असे तोंडी सांगितल्याने ग्रामस्थ क्रमांक झाले होते.
एकंबा गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यानी संबंधित विभागाचे अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री कामाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाचा आलेला निधी परस्पर उचलुन घेतला आहे व गावांत कोणत्याही प्रकारचे वरील प्रमाणे कामे केलेली नाहीत. या कामाची सविस्तर चौकशी करुन, प्रत्यक्षात वरील कामे हि झालीत का नाहीत? याबाबतचा पंचनामा गांवकऱ्यासमक्ष करण्यांत यावा. संबंधित दोषींवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यांत यावी. याबाबत किती दिवसात चौकशी आणि कार्यवाही करणार याच लेखी पात्र द्यावा तरच उपोषण मागे घेण्यात येईल असे गावकर्यांनी खडसावून सांगितल्याने गटविकास अधिकाऱ्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले आहे.
शासनाच्या योजनेचा गावकर्यांना लाभ मिळावा – गंगाप्रसाद रामजी कंदेवाड
याबाबत प्रमुख तक्रारकर्ता गंगाप्रसाद रामजी कंदेवाड यांनी म्हंटले कि, नळ योजनेची विहिर, फिल्टर पाणी मशिन, अंगणवाडी लहान मुलांचे साहित्य, नाल्या व इतर विकास कामांचं अंदाजपत्रक न करता सरपंच, उपसरपच, ग्रामसेवक यांनी कामे न करता निधी उचलून हडप केला आहे. आम्ही तक्रार दिल्यानंतर राजकीय नेत्याकडून आमच्यावर दबाव टाकण्यात आला आपला काय ते मिटवून घेऊ असे म्हणून अमिश दाखविण्यात आले. जनतेच्या नागरी समस्यासाठी आम्ही हे पूल उचलले आहे आमच्या मागणीप्रमाणे चौकशी करून कार्यवाही करावी आणि शासनाच्या योजनेचा गरजूना लाभ मिळावा हीच आमची माफक अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.