Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Police Mitra Cup competition : पोलीस मित्र करंडक स्पर्धेत सब्बनवार प्रशालेचे घवघवीत यश -NNL

Police Mitra Cup competition : पोलीस मित्र करंडक स्पर्धेत सब्बनवार प्रशालेचे घवघवीत यश -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
कुंडलवाडी| कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित पोलीस मित्र करंडक २०२४ तालुका स्तरिय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत येथील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. १५ सप्टेंबर रोजी आयोजित "आई-वडील हेच आद्य दैवत " या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत या शाळेची कु.आरती बालकिशन मोकळे ही सर्वतृतीय आली तर १० ऑक्टोबर रोजी आयोजित "व्यसनाधीनता -एक सामाजिक समस्या "या विषयावरील निबंध स्पर्धेत कु.आरती मोकळे ही सर्वद्वितीय तर याच शाळेची महादेवी दत्ता मोरे ही सर्वतृतीय आली आहे. या यशाबद्दल सदर दोन्ही विद्यार्थींनीचे संस्था सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार, शाळेचे मुख्याध्यापक कल्याण गायकवाड, नागनाथ चेटलूरे यांच्यासह शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे....
Abhishtchintan ceremony : c आऊलवार यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा -NNL

Abhishtchintan ceremony : c आऊलवार यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे| जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प.नांदेड चे कर्तव्यदक्ष, समाजकल्याण विभागातील सर्व अधिकारी व वस्तीगृह कर्मचारी यांना मायेचा आपुलकीचा (ओलावा) आधार देणारे मा सतेंद्रजी आऊलवार यांचा जि.प.नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी व वस्तीगृह संचालक, वस्तीगृह कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा समाजकल्याण ऑफीस नांदेड येथे वाढदिवसा निमित्ताने केक कापून त्यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी मा.संदिप माळोदे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड ), समाजकल्याण कर्मचारी महेश दवणे ,राजेश सोनटक्के ,ठाकूर ,आदित्य देवडे ,किरण पडलवार , शेख मँडम,यांच्यासह अनेक कर्मचारी आणि वस्तीगृहातील कर्मचारी गणेश ठोके ,माणिक यंबडवार, करंदीकर ,विलास वाघमारे, हर्ष कुंडलवाडीकर ,सुमेध सोनकांबळे ,संतोष मुंडे ,गवलवाड सर ,सुरेंद्र गायकवाड , नामदेव गजले ,...
prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL

prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच सर्व उपविभागीय कार्यालये, जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 15 ऑक्टोबर, 2024 रोजी अंमलात आला असू...
You can become a voter in two days : वेळ गेली नाही ! उद्या आणि परवा दोन दिवसात मतदार बनू शकता-NNL

You can become a voter in two days : वेळ गेली नाही ! उद्या आणि परवा दोन दिवसात मतदार बनू शकता-NNL

नांदेड, लाइफस्टाइल
• 19 ऑक्टोबर मतदार बनण्याची शेवटची तारीख • अर्ज क्र. 6 भरा आजच ऑनलाईन-ऑफलाईन अर्ज करा • 1 ऑक्टोबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण झालेले तरुणही पात्र • मतदार यादीत आजच आपले नाव तपासून घ्या • ऑनलाईन माहिती घेता येते, ऑफलाईनही माहिती मिळते नांदेड| विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणूकीत मतदान करण्यासाठी आपण मतदार यादीत नसाल तर पुढची दोन दिवस तुम्हाला संधी आहे. 19 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. 19 ऑक्टोबर पर्यंत आपण मतदार होऊ शकता. यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप, वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आपण ऑनलाइन अर्ज क्र ६करू शकता. तसेच मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात जाऊन मतदार होऊ शकता. यासंदर्भात 1800-22-1950 या हेल्पलाइनची मदत घेऊ शकता. मतदानाची अंतिम यादी पुर्ण करण्याची तारीख ही नामांकन प्रक्रिया होईपर्यंत सुरू असते. त्यामुळे ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंद केली नाही त्...
sports competition : जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यालयाचे यश -NNL

sports competition : जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यालयाचे यश -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड| सायन्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय 600 मीटर धावणे क्रिडा स्पर्धेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक व 200 मीटर धावणे मध्ये विद्यार्थी सोहम दिगांबर चक्रधर याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड या शाळेचा विद्यार्थी सोहम दिगांबर चक्रधर याने सायन्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय 600 मीटर धावणे क्रिडा स्पर्धेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक व 200 मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यास विद्यालयाचे क्रीडाशिक्षक एस. एम.मुदिराज यांनी मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांत विद्यालयाने चांगले यश मिळविल्याने संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव,प्राचार्य साहेबराव देवरे, पर्यवेक्षक व्ही.एस पाटील,वरिष्ठ लिपीक वसंत...
Loha assembly area : लोहा विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी १३ वेगवेगळे पथक -NNL

Loha assembly area : लोहा विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी १३ वेगवेगळे पथक -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठक व नियोजन केले जात आहे.निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी आज कर्मचारी तलाठी ग्रामसेवक तसेच वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी कर्मचारी याची बैठक घेतली.आचारसंहिता अंमलबजावणी , बैठे, व्हिडिओ शूटिंग, प्रचार सभा , असा १३ पथकाना कामाचे स्वरूप तसेच कायद्याची बाजू समजावून सांगितली.काळात हलगर्जीपणा करू नये असा सक्त सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या. लोहा तहसील कार्यालयात लोहा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत १३ पथकाच्या प्रमुखांची तसेच कर्मचारी अधिकारी यांची बैठक पार पडली.यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, तहसीलदार कंधार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संदीप हाडगे (लोहा) , नायब तहसीलदार रेखा चमणार (कंधार) निवडणूक महसूल सहायक तिरुपती मुंगरे, राजेश...
Sport Dance Competition : राज्यस्तरीय शालेय स्पोर्टडान्स स्पर्धेसाठी क्रीडा विभागाची तयारी -NNL

Sport Dance Competition : राज्यस्तरीय शालेय स्पोर्टडान्स स्पर्धेसाठी क्रीडा विभागाची तयारी -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत नुकतीच पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड अंतर्गत सन 2024-25 मधील स्पोर्टडान्स क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सन 2024- 25 मधील राज्यस्तरीय क्रीडा राज्यस्तरीय खेळ स्पोर्टडान्स तसेच इतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा वयोगट 19 वर्षे मुले मुली स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याकडे आहे. त्याअनुषंगाने या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स डान्स कामाचा आढावा घेण्यात आला. राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स संदर्भात स्पर्धेमध्ये 1 (...
Special Lok Adalat : उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे 30 नोव्हेबर व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन -NNL

Special Lok Adalat : उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे 30 नोव्हेबर व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन -NNL

नांदेड, क्राईम, छत्रपती संभाजीनगर
नांदेड| मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे नांदेड जिल्हयातील प्रलंबित असलेले दिवाणी अपील व तडजोड पात्र फौजदारी अपील आभासी (ऑनलाईन) पध्दतीने विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे 30 नोव्हेंबर व 1 डिसेबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्या पक्षकरांची तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी आपली प्रकरणे आपसी समन्वयातुन तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. संबधीत पक्षकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. दलजीत कौर जज यांनी...
Bhikkhu Sangha in Khurgaon : १९ रोजी खुरगावला भिक्खू संघाचा वर्षावास समापन कार्यक्रम -NNL

Bhikkhu Sangha in Khurgaon : १९ रोजी खुरगावला भिक्खू संघाचा वर्षावास समापन कार्यक्रम -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आश्विन पौर्णिमेनिमित्त १९ आॅक्टोबर रोजी पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमात भिक्खू संघाच्या वर्षावास समापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी दिली. पौर्णिमोत्सव कार्यक्रमांतर्गत सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, भोजनदान, आर्थिक दान, दान पारमिता, भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. आश्विन पौर्णिमेला भिक्खूंचा वर्षावास कालावधी संपतो. या निमित्ताने भदंत पंयाबोधी थेरो यांचा १६ वा वर्षावास समापन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मान्यवरांचे मनोगत, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांचा समाजजागृतीपर कार्य...
error: Content is protected !!