Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
former MP Kabde : नांदेड हे पर्यटन यासाठी महत्त्वपूर्ण स्थान ठरावे-माजी खासदार काबदे -NNL

former MP Kabde : नांदेड हे पर्यटन यासाठी महत्त्वपूर्ण स्थान ठरावे-माजी खासदार काबदे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड येथील हुतात्मा स्मारक परिसरातील स्वच्छता महानगरपालिका आणि जनतेने तसेच स्वयंसेवी संस्थांनी करावे. स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांचे स्मरण राहिला हवे. नांदेड हे पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण स्थान ठरावे अशी अपेक्षा माजी खासदार तथा मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काबदे यांनी केले. ते 17 ऑक्टोबर 2024 रोजी, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता आयोजित हुतात्मा स्मारक परिसरातील स्वच्छता या विषयावर बोलत होते. डॉक्टर व्यंकटेश काबदे यांनी पुढे असेही म्हणाले की, ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिल त्यांच्या प्रती कृतज्ञता ठेवणं हल्ली खूप गरजेचे झालेले आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात जुन्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या विसरून चालणार नाही. जुन्या काही घटना समाजासाठी प्रेरणादायी आहेत. ते पुढे असेही म्हणाले की स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच यांच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेचा का...
Will play at inter university level :: श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयायाचे हँडबॉल स्पर्धेत यश ; आंतर विद्यापीठ स्तरावर खेळणार -NNL

Will play at inter university level :: श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयायाचे हँडबॉल स्पर्धेत यश ; आंतर विद्यापीठ स्तरावर खेळणार -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
लोहा| लोहा येथील श्री संत गाडगे महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आंतर महाविद्यालय व आंतर विभागीय पातळीवर हॅन्ड बॉल स्पर्धेत मुलाच्या संघाने यश मिकविले. या महाविद्यालयाचा संघ आता आंतर विद्यापीठ पातळीवर नांदेड विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे. प्राचार्य डॉ अशोकराव गवते पाटील यांनी टीम व क्रीडा प्रशिक्षक याचे अभिनंदन केले आहे विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयांच्या प्रांगणावर (१६ ऑक्टोबर) रोजी आंतर महाविद्यालयीन हॅन्ड बॉल स्पर्धा पार पडली यात लोह्याच्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या मुलाच्या संघाने महाविद्यालयीन व विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेमध्ये दुहेरी यश पटकाविले. हा संघ पुढे होणाऱ्या अंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा हॅन्डबॉल संघातील कु.श्वेता बालाजी गाेरपल्ले व कु.जागृती गंगाधर क...
Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 19 ऑक्टोबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 2 नोव्हेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 19 ऑक्टोबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 2 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही...
Grand nagarkirtan yatra ; मातासाहेब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमाचे समारोपात हजारों भाविक; मातासाहेब ते नांदेड भव्य नगरकीर्तन यात्रा -NNL

Grand nagarkirtan yatra ; मातासाहेब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमाचे समारोपात हजारों भाविक; मातासाहेब ते नांदेड भव्य नगरकीर्तन यात्रा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। ऐतिहासिक गुरुद्वारा मातासाहेब मुगट येथे मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या मातासाहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता भव्य नगरकीर्तन कार्यक्रमाने झाली. बुधवार, दि. 16 रोजी सकाळी 9 वाजता कीर्तन दरबार व दिवान कार्यक्रमास सुरुवात झाली. समापन कार्यक्रमात तख्त सचखंड श्री हजुरसाहेबचे मित जत्थेदार संतबाबा ज्योतिंदर सिंघजी, हेड ग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मित ग्रंथी भाई गुरमीत सिंघजी, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा तेजासिंघजी जत्थेदार मातासाहेब यांची प्रमुख उपस्थितीती होती. आज कीर्तन दरबार मध्ये भाई बलविंदरसिंघ रंगीला, भाई पिंदरसिंघजी रागी जत्था यांचे शबदगायन झाले. श्री आनंदसाहेबचे पाठ आणी श्री गुरु ग्रन्थसाहेब यांचा हुकुमनामा वाचण्यात आला. तसेच कार्यक्रम समापन अरदास करण्यात आली. यावेळी शिरोमणि अकाली बुड्ढा दल 96 करोडी...
Election restrictions : निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध; आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! -NNL

Election restrictions : निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध; आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! -NNL

महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 व 16 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारतीय  नागरीक  संरक्षण  संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे या ठिकाणी पुढील बाबी करण्‍यास विविध आदेशान्‍वये बंदी घातली आहे. विश्रामगृहावर बैठका बंद -  कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक/मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्‍याग्रह करणे. कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, इत्‍यादी. कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर बंदी आहे. लाऊडडस्पिकर परवानगीशिवाय नाही -कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानग...
Prohibition of storage and sale : परदेशातून आयात केलेले फटाके साठवणूक व विक्रीस प्रतिबंध -NNL

Prohibition of storage and sale : परदेशातून आयात केलेले फटाके साठवणूक व विक्रीस प्रतिबंध -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड| दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांनी  करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसुत्रता आणण्यासाठी व निश्चित कार्यपध्‍दती आवश्‍यक असल्‍याने सबंधित यंत्रणा यांना पुढीलप्रमाणे सुचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सर्व उपविभागीय दंडाधिकारी जिल्‍हा नांदेड, सर्व कार्यकारी दंडाधिकारी जिल्‍हा नांदेड, सर्व  मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) जिल्‍हा नांदेड व ईतर प्राधिकरण यांना पुढीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहेत. विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होणार नाही याकरीता संबंधित यंत्रणांनी  सतर्क रहावे. त्याचप्रमाणे नियमित तपासणी करावी. विदेशी फटाक्यांची  साठवण...
Chief Electoral Officer S.Chokkalingam : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम -NNL

Chief Electoral Officer S.Chokkalingam : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुबंई| भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये   दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते. अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना  दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दो...
CIDCO Regional Office : सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांच्यी नेमणूक करणे गरजेचे -NNL

CIDCO Regional Office : सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांच्यी नेमणूक करणे गरजेचे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांच्यी नेमणूक करणे गरजेचे असुन कार्यालय येथील कर्मचारी यांच्या उपस्थितीती सह अनेक योजना जनजागृती व आर्थिक उत्पन्न वाढ करण्यासाठी समन्वयक म्हणून नेमणूक करणे अपेक्षित असल्याचे बोलल्या जात आहे. नवामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे आतापर्यंत मुख्यालय यांच्या कडून अनेक प्रकरणांत काना डोळा करण्यात येत असल्याने अधिकारी , कर्मचारी समन्वय अभाव, दैनंदिन उपस्थिती बाबत मनमानी, यासह नाव परिवर्तन, नवीन मालमत्ता क्रमांकासाठी संचिका यासह अनेक मालमत्ता धारक प्रश्न अनुत्तरित आहेत तर‌ गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता सर्व्ह न झाल्याने अनेक अपार्टमेंट व नवीन वसाहतीतील अनेक मालमत्ता नोंदणी केली नाही, परिणामी मनपाचे आर्थिक उत्पन्न घटले आहे.‌‌ कार्यालयीन कामकाज साठी नागरिक यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ...
Collector Abhijit Raut : 40 दिवसांसाठी 24 तास सतर्क रहा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

Collector Abhijit Raut : 40 दिवसांसाठी 24 तास सतर्क रहा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
प्रशासन इलेक्शन मोडमध्ये ;नोडल अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक नाकाबंदी सुरू ; होर्डिंग काढणे, फलके साफ करण्याला गती कर्मचाऱ्यांनो ! मुख्यालय सोडू नका ; मोबाईल बंद ठेवू नका विधानसभा,लोकसभा निवडणूक समर्थपणे यशस्वी करण्याचे आवाहन नांदेड| विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन 'इलेक्शन मोड 'मध्ये आले आहे. सर्व नोडल अधिकारी, जिल्हा परिषद महानगरपालिका पोलीस विभागाच्या जवळपास 70 शीर्षस्थ अधिकाऱ्यांची आज मॅरेथॉन बैठक झाली. यामध्ये 40 दिवस 24 तास सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले. नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेले स्पष्ट निर्देश पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात आणून दिले. निवडणूक आयोगाने यावर्षी मतदार संख्या वाढविण्याचे नाकाबंदी काटेकोर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे निवडणूक काळामध्ये...
Digambar Kale : आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी बेमुदत थाळी नाद आंदोलन मागे घेण्यात आले – दिगंबर काळे -NNL

Digambar Kale : आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी बेमुदत थाळी नाद आंदोलन मागे घेण्यात आले – दिगंबर काळे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| दिनांक 15/10/2024 मा. निवडणूक आयोग यांचे पत्रकार परिषदेनंतर तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने आपण आदर्श आचारसंहितेचे पालन करावे व आपले दिनांक 16/10/2024 रोजीचे नियोजित बेमुदत थाळी नाद आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. असे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्ते कॉम्रेड दिगंबर काळे यांनी दिली आहे. हिमायतनगर येथील लोक विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड दिगंबर काळे, हिमायतनगर कॉम गणेश रचेवाड, नवीन कुमार मादसवार, गंगाधर गायके यांनी दिनांक 29/09/2024 ते 30/09/2024 च्या बेमुदत धरणे आंदोलन केले होते. यातील प्रमुख उर्वरित प्रश्न व मागणीसाठी तहसीदार तथा अध्यक्ष यांच्या परमेश्वर मंदिर ट्रस्टसमोर दिनांक 16/10/2024 रोजी शासनाच्या विरोधात बेमुदत थाळी नाद आंदोलन करीत असल्याचे पत्र डेप्युटी कलेक्टर महेश वडदकर यांची भेट घेऊन ज...
error: Content is protected !!