Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Kalu Ram Rawat ; विधानसभेसाठी पोलीस विभागाचे निवडणूक निरीक्षक कालु राम रावत यांचे आगमन – NNL

Kalu Ram Rawat ; विधानसभेसाठी पोलीस विभागाचे निवडणूक निरीक्षक कालु राम रावत यांचे आगमन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | विधानसभा निवडणुकीसाठी राजस्थान कॅडरचे २००८ तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत यांचे आज नांदेड येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. कालुराम रावत शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराडे ( 88888921OO)त्यांच्यासोबत असतील. नागरिकांना नांदेड विश्रामगृहातील व्हीआयपी सूट क्रमांक एक मध्ये त्यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल....
Construction of vote counting ; नांदेड लोकसभा व विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती – NNL

Construction of vote counting ; नांदेड लोकसभा व विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6 व विधानसभेसाठी 6 अशा 12 मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच वेळेस येत असल्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी देखील नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात होणार आहे. अन्यवेळी नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशीच विधानसभेची मतमोजणी शहरात होत होती. मात्र यावेळी दोन्ही निवडणुका सोबत असल्यामुळे भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या लोकसभा क्षेत्रातील विधानस...
voter awareness ; मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद ,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम – NNL

voter awareness ; मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद ,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम – NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संसद,संकल्प पत्र व #मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपच्या नोडल अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतील मतदार #जनजागृती (स्वीप) अंतर्गतचे उपक्रम सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह 83- किनवट विधानसभा मतदार संघात राबवित आहेत. या अनुषंगाने येथील सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. नव मतदारांचा युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. नवमतदारांची स्वा...
Chandrasekhar Bawankule : विकासाचा चढता आलेख कायम ठेवायन्यासाठी श्रीजयाताईला विधानसभेत पाठवा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे -NNL

Chandrasekhar Bawankule : विकासाचा चढता आलेख कायम ठेवायन्यासाठी श्रीजयाताईला विधानसभेत पाठवा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे -NNL

नांदेड, राजकीय
भोकर,गंगाधर पडवळे| होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाचा आलेख वाढविण्यासाठी महायुती सरकार आवश्यक आहे. असेच भोकर विधानसभा क्षेत्रातील विकास हा इतर विधानसभेपेक्षा नक्कीच जास्त प्रमाणात झाला. आणि यापुढेही अश्याच प्रकारे वाढत जाणार आहे. विकासाचा चढता आलेख कायम ठेवायचा असेल तर श्रीजयाताईला विधानसभेत पाठविणे आवश्यक आहे. असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते आज भोकरमध्ये काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीच्या सभे दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महायुतीचे सरकार राज्यात आले आणि अनेक सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले त्यात मोफत शेतीसाठी वीज, झिरो वीज बिल, एक रुपयात पीक विमा भरून देणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत रॅशन, स्वछगृह...
Collector Abhijit Raut  : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव -NNL

Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| लोकसभा पोट निवडणूक तथा 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आज इतर मतदान अधिकारी यांचे नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षण कक्षाच्यावतीने एकूण दहा कक्षात पीपीटी द्वारे मर्यादित गटास परिणामकारक प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रत्येक कक्षात जावून स्वतः प्रशिक्षणार्थी होवून प्रशिक्षणाचा अनुभव घेतल्यामुळे इतर प्रशिक्षणार्थींचा उत्साह द्विगुणित झाला. प्रशिक्षण देणाऱ्या मास्टर ट्रेनरला कांही शंका विचारुन शंकेचे समाधान करुन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत याच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ , तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेश कुमार बोलेलू, प्रशिक्षण टिममधील संजय भालके, मुख्याध्यापक सुनील दाचा...
Local crime branch team seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 03 आरोपीकडून मोटार सायकलसह 1,50,000/- चा मुद्देमाल केला जप्त -NNL

Local crime branch team seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 03 आरोपीकडून मोटार सायकलसह 1,50,000/- चा मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील तिन आरोपीतांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण 03 मोटार सायकल किमती रु. 1,50,000/- (अक्षरी एक लाख पन्नास हजार) चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल स्थागुशाच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी "ऑपरेशन फ्लश आऊट" अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन, त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेश दिले होते. त्यावरुन दिनांक 14/10/2024 रोजी साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु शा, नांदेड हे त्यांचे टिम मधील अंमलदार यांचे सोबत नांदेड शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना मिळालेल्या गुप्त माहीती मिळाली. यावेळी माळटेकडी ओ...
Vanchit suddenly changed his candidate : किनवट/माहुर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असताना वंचितने अचानक उमेदवार बदलला -NNL

Vanchit suddenly changed his candidate : किनवट/माहुर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असताना वंचितने अचानक उमेदवार बदलला -NNL

नांदेड, राजकीय
किंनवट, परमेश्वर पेशवे| सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यावर्षीची विधानसभा निवडणूक ही विशेष ठरणार आहे. गेल्या दोन वर्षाचे राजकारण पाहता मतदारांमध्ये पूरता गोंधळ उडालेला दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून विद्यमान सरकार स्थापन झाले होते. विद्यमान सरकार स्थापन होताना पक्ष फुटी मोठ्या प्रमाणात झाली या फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका सर्वच मुख्य पक्षांना बसलेला दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे ही फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले दिसून येत नाही. यामुळे जनता निश्चित कोण कोणाच्या बाजूने देईल हे सांगता येणार नाही. त्यातच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण व धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकारला योग्य निर्णय घेता आलेला दिसून येत नाही. अशातच मराठा व ओबीसी संघर्ष पराकोटीला गेलेला दिसून येत आहे. याचाही फटका नेमका कोणाला बसेल हे निश्चित सांगता येणार नाही. एक म...
Narayani Gym : नारायणी जिमचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

Narayani Gym : नारायणी जिमचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या नारायणी जिमचे उद्घाटन नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. नांदेड येथील काबरानगर रिंग रोडवर (अंबिका मंगल कार्यालय समोर) नारायणी जिम सुरू करण्यात आली आहे. विनायक पाथरकर यांच्या पुढाकरातून सुरू केलेली जिम नांदेडकरांसाठी वरदान ठरणार आहे. या जिम मध्ये आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञान असलेल्या मशनरी व व्यायामाचे साहित्य उपलब्ध करण्यात आले असून नांदेडच्या जिम धारकांना ही चांगली नामी संधी उपलब्ध झाली आहे असे आमदार कल्याणकर म्हणाले. आधुनिक पद्धतीची एकमेव जिम म्हणून नारायणी जिमचा नावलौकिक करावा लागेल असे आ. कल्याणकर म्हणाले. प्रारंभी आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते फीत कापून जिम चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युनियन बँकेचे शाखाधीकारी योगेश महाजन, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, सराफा सुवर्णक...
Nanded-Panvel-Nanded special train : नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी मार्गे लातूर-पुणे आणि नांदेड-विजयवाडा विशेष गाडी -NNL

Nanded-Panvel-Nanded special train : नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी मार्गे लातूर-पुणे आणि नांदेड-विजयवाडा विशेष गाडी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी लातूर-पुणे मार्गे आणि नांदेड-विजयवाडा विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. त्या बाबतचा तपशील खालील प्रमाणे असल्याची माहिती रेल्वे विभागाने जारी केली आहे. नांदेड-पनवेल विशेष गाडीची एक फेरी : गाडी क्रमांक 07685 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 02 नोवेंबर, 2024 शनिवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 16. 15 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.15 वाजता पोहोचेल. पनवेल - नांदेड विशेष गाडी ची एक फेरी : गाडी क्रमांक 07686 पनवेल ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 03 नोवेंबर, 2024 रविवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि पुणे, दौं...
voter awareness : मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद , संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम संपन्न -NNL

voter awareness : मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद , संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने मतदार जनजागृती साठी येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संसद , संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपच्या नोडल अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतील मतदार जनजागृती (स्वीप) अंतर्गतचे उपक्रम सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह 83- किनवट विधान सभा मतदार संघात राबवित आहेत या अनुषंगाने येथील सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. नव मतदारांचा युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. नवमतदारांची स्वागत करण्यात आले...
error: Content is protected !!