नांदेड| मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील तिन आरोपीतांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण 03 मोटार सायकल किमती रु. 1,50,000/- (अक्षरी एक लाख पन्नास हजार) चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल स्थागुशाच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन, त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेश दिले होते. त्यावरुन दिनांक 14/10/2024 रोजी साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु शा, नांदेड हे त्यांचे टिम मधील अंमलदार यांचे सोबत नांदेड शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना मिळालेल्या गुप्त माहीती मिळाली.

यावेळी माळटेकडी ओव्हर ब्रिजचे खाली इसम नामे 1) पांडुरंग बाबाराव जाधव वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. कुदळा ता. उमरी जि. नांदेड 2) आनंद नागोराव कदम वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा बेदी ता. नायगाव जि. नांदेड 3) व्यंकटेश ऊर्फ नायडु दादाराव जाधव वय 19 वर्ष व्यवसाय बेकार रा. महाटी ता. उमरी जि. नदिड ह. मु. बळवंतनगर, नायगाव ता. नायगाव जि. नांदेड यांना त्यांचे ताब्यातील कागदपत्रे नसलेल्या चोरीच्या 03 मोटार सायकलसह ताब्यात घेतली.

त्यांना कागदपत्रे नसलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, नांदेड शहरातुन एक व नायगाव येथुन दोन अशा एकुण 03 मोटार सायकल चोरी करुन आणल्या आहेत. सदर आरोपीतांचे सांगण्याप्रमाणे पोउपनि. पुयड यांचे पथकाने गुन्हे अभिलेखाची पाहणी केली. यात सदर मोटार सायकल बाबत नांदेड शहरातील पो. स्टे. शिवाजीनगर गु.र.नं. 405/2024 कलम 303(2) भा. न्या. से., पो.स्टे. नायगाव गु.र.नं. 259/2024 कलम 303(2) भा. न्या. सं. व पो. स्टे. नायगाव गु.र.नं. 206/2024 कलम 303(2) भा.न्या.सं.असे अभिलेखावर दाखल असल्याचे दिसुन आले आहे. सदर तिन आरोपीतांचे ताब्यातुन वेगवेगळया कंपनीच्या एकुण 03 मोटार सायकल किंमती रु. 1,50,000/- (अक्षरी- एक लाख पन्नास हजार) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नामे 1) आनंद नागोराव कदम रा. बेंद्री ता. नायगाव जि. नांदेड, 2) व्यंकटेश ऊर्फ नायडु दादाराव जाधव रा. महाटी ता. उमरी जि. नांदेड ह. मु, बळवंतनगर, नायगाव ता. नायगाव जि. नांदेड व त्यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या दोन मोटार सायकल किमती रु. 70,000/- चा मुद्देमाल पो. स्टे. नायगाव गुर.नं. 206/2024 कलम 303(2) भा. न्या. सं. चे तपास कामी व आरोपी नामे पांडुरंग बाबाराव जाधव रा. कुदळा ता. उमरी जि. नांदेड यास पो. स्टे. शिवाजीनगर गु.र.नं. 405/2024 कलम 303(2) भा. न्या. सं. चे तपास कामी देण्यात आले आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड एस. व्हि. पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, विलास कदम, संतोष बेलुरोड, तिरुपती तेलंग, संदिप घोगरे, राजु डोंगरे, अमोल घेवारे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व सायबर सेल येथील पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, व्यंकटेश सांगळे याची केली आहे. हि धडाकेबाज कामगिरी करणारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.