नांदेडसोशल वर्क

Women’s day : सुपर हंड्रेड टीमतर्फे महिला दिन उत्साहात साजरा : महिला सखी बीमा प्रतिनिधींचा सत्कार

नांदेड | आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुपर हंड्रेड टीमच्या वतीने महिला सखी बीमा प्रतिनिधींसोबत महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी टीममधील सर्व महिला सखी एकत्र येऊन महिला सक्षमीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व महिलांचा विशेष उपहार देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. महिलांनी आपल्या परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाजात आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेचा आधार मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी “सशक्त महिला – समृद्ध समाज” हा संदेश देत महिलांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

महिला सखींच्या प्रेरणादायी कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून भविष्यातही अशाच प्रकारे एकत्रितपणे प्रगतीचा नवा अध्याय लिहूया, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!