Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - देश विदेश - Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL
देश विदेश राजकीय October 15, 2024

Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवी दिल्ली|  महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी  होणार आहे. 

राजधानीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि  झारखंड  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा  पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला.  भारत निवडणूक  आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार , संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.   

असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. 22 ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी होणार आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येऊ शकेल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल. 

महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती

महाराष्ट्रात एकूण 36  जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे.  यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी  असून, अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर  29 जागा  या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.  राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून, यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान  केंद्रे  शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात असतील.

यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती श्री. राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2  हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नांदेड, केरळ आणि उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ,मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड मतदारसंघातील विद्यमान खासदर वसंतराव  चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या  जागेसाठी ही पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य  आयुक्तांनी दिली.  यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.

पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूका सुनिश्चित करण्यासाठी  निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली दक्षता  व राज्यांना याबाबत दिलेले निर्देश 

भारत निवडणूक आयोगाकडून  जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात , पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे , मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, शक्य असेल तिथे सर्व मतदान केंद्रांमध्ये  100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे,  सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे-  विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थाना पासून 2 किलोमीटरच्या आत  असल्याची खातरजमा , ‘पब्लिक डिफेसमेंट अॅक्ट‘ अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व  सोशल मीडियावर लक्ष ठेवून,खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे   निर्देश दिले आहेत.

                            निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या बदलांमुळे मतदार आणि उमेदवारांना अधिक सोयी आणि सुलभता मिळणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया डिजिटल झाली असून, मतदारांना घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करता येते. मतदान केंद्राची माहितीही ऑनलाइन पाहता येते. ई-ईपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली  असून, सी-विजिल अॅपच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही गैरकृत्यांची माहिती थेट आयोगाला देता येते, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येते.

उमेदवारांसाठीही आयोगाने सुविधा पोर्टल उपलब्ध केले आहे, ज्याद्वारे उमेदवार नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील. याशिवाय, उमेदवारांच्या KYC ची संपूर्ण माहिती, जसे की गुन्हेगारी नोंदी,  आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रचारासाठी सभा, रॅलींसाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे.या नवीन तंत्रस्नेही पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे. याबाबत, ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदार आणि उमेदवारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

announced Assembly elections program
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHemant Patil took the oath of Legislative Council MLA : हेमंत पाटील यांनी घेतली विधानपरिषद आमदारकीची शपथ ; कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष -NNL
Next Article Tribute to former professor : माजी प्राध्यापक कॉ.जी.एन.साईबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर आदरांजली -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Guardian Minister Atul Save : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

May 2, 2025

Madhavrao Patil Devsarkar : स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर तर्फे आयोजित नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद -NNL

October 1, 2024

Dumping Grab in School : शाळा परिसरात कचरा व घाण टाकण्याचा प्रकार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती

January 16, 2026

Conduct of National Lok Adalat : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

November 15, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mla Pratap Patil ; वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या उंडाडे व सुनेगाव येथील पिटटलेवाड कुटुंबियाला आ चिखलीकरांच्या हस्ते प्रत्येकी चार लक्ष रुपयांची मदत

illegal encroachment holders : नांदेड पोलीस व महानगरपालीका यांचे समन्वयाने अवैध अतिक्रमण धारकावर धडक कारवाई

sap-sucking worms and pink bollworms ; असे रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन… – NNL

Jagar program : नवभारत साक्षरता अभियान योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न -NNL

Awareness workshop : नांदेड येथे करण्यात आले जागरूकता कार्यशाळेचे आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?