Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL
नवी दिल्ली| महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राजधानीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार , संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.
असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतद...
