नांदेड

माजी खा सुभाष वानखेडे यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत देताच हदगाव विधानसभाक्षेञात खळबळ …! -NNL

हदगाव, शेख चांदपाशा| जर पक्षश्रेष्ठीनी मला हदगाव विधानसभा लढविण्याची अनूमती दिल्यास आपण ती निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच सुतोवाच माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केल्याने माञ महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसुन येत आहे. वानखेडे यांनी विधानसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे केलेल्या दाव्यामुळे आपल्याच घरात घराणेशाही चालविण्याच्या प्रयत्नात आसलेल्यामध्ये खळबळ माजली आहे.

शुक्रवारी नादेंडला हिंगोली लोकसभेचे माजी खा सुभाष वानखेडे यांनी पञकारासमावेत वर्तालाप केल्याने आपल मनोदय व्यक्त केला होता. विशेष म्हणजे हदगाव विधानसभाक्षेञ हदगाव व हिमायनगर ह्या दोन तालुक्यात समाविष्ट असल्याने हदगावच्या प्रथम टोकापासुन ते हिमायनगरच्या शेवटच्या टोका पर्यत त्याचे चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे यामध्ये बहुसंख्य सर्वसामाजातील सर्वसामान्याची भरणा आहे. खा वानखेडे यांनी हदगाव विधानसभाक्षेञाच तीन वेळा हिगोली लोकसभेचा एकवेळ नेतृत्व केलेले आहे.

त्यांनी आपल्या कार्यकाळात लाभाच्या कोणत्याही संस्थाच जाळ उभ केलेले नाही. अणखी विशेष म्हणजे त्यांनी त्याच्या कार्यकाळात ‘नात्या गोत्याच कधीच राजकारणा केले नाही’ हे त्याच गुण सर्वसामान्य नागरिकांना फार आवडतो. माञ अलिकडच्या काळात खासदरकीच्या शेवटच्या काळात माञ त्याच्या आवती भोवती संधीसाधुची संख्या पण वाढलेली होती. परिणाम स्वरुप सर्वसामन्याशी असलेल संबध माञ कुठं तरी दुरावा निर्माण होत गेल अस काही त्यांच्या चाहत्याच म्हणने आहे. त्याच्या आजच्या इच्छेमुळे माञ काही प्रस्थापिताच माञ हिरमोड होत असल्याच दिसुन येत आहे.

दुसरी बाब अशी की, त्याची सर्वसामान्यशी असलेल नात जे काही बोलायच ‘रोखठोक ‘स्पष्ट भुमिके मुळे ही त्यांच काहीस राजकीय नुकसान झालेलं आहे. माजी खा. सुभाष वानखेडे यांची काम करण्याची शैलीच जरा वेगळी आहे. त्यांच्याकडे तडजोड होत नसते प्रशासकीय यंञणेवर चागलीच पकड ठेवतात. त्यांच्या कार्यकाळ अवैद्य धंद्यांना थारा नव्हता. कोणत्याही अधिका-याला अवश्यकता पेक्षा जास्त किमत देत नाहीत. यामुळेच अधिकारी व कर्मचारी जरा दबकूनच असतात. विधानसभेत ही हदगाव तालुक्याचे प्रश्न नेहमी सभागृहात पोटतिडकीने माडतात. हा त्यांचा गुण पण सर्वाना भावतो.

हदगाव शहरातील नगरपरिषदेला नववैभव प्राप्त करुन देणारे व अनेक वर्षापासुन शहराची हद्दवाढ, कायमस्वरुपी पाणी पुरवाठाच प्रस्ताव, जलशुध्दीकरण प्रकल्प मंजुरी, न.पा.ची भव्य दुमजली इमारत, यासह उद्यान, संतरोहीदास सभागृह, शादीखाना हिमायतनगर शहराला तालुक्याचा दर्जा हे त्याच्या कार्यकाळात झालेली विशेष कामे आहेत. इतकेच नव्हे तर हदगाव शहर व्यतिरिक्त विधानसभा क्षेञात अनेक विकास कामे त्याच्या कार्यकाळात झळाळी आहेत ही त्यांची जमेची बाजु आहे.

सत्ता कुणाची असो विकास निधी आणतात..!
माजी खा. वानखेडे यांचे खास वैशिष्ट्ये हे आहे की, सत्ता कुणाची असो माञ विकास निधी आणण्यात माञ त्यांचा हतखंडा आहे, इतकेच नव्हे तर विरोधात राहुन ही सत्ताधारी मंञी हदगाव विधानसभाक्षेञात आणुन त्या विकास कामाचे उदघाटन ही सत्तेतील मंञ्याद्वरे करतात. अशी अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळाल्यास नक्कीच जनता त्यांनी केलेल्या कार्याची पावती देतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!