माजी खा सुभाष वानखेडे यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत देताच हदगाव विधानसभाक्षेञात खळबळ …! -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| जर पक्षश्रेष्ठीनी मला हदगाव विधानसभा लढविण्याची अनूमती दिल्यास आपण ती निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच सुतोवाच माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केल्याने माञ महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसुन येत आहे. वानखेडे यांनी विधानसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे केलेल्या दाव्यामुळे आपल्याच घरात घराणेशाही चालविण्याच्या प्रयत्नात आसलेल्यामध्ये खळबळ माजली आहे.
शुक्रवारी नादेंडला हिंगोली लोकसभेचे माजी खा सुभाष वानखेडे यांनी पञकारासमावेत वर्तालाप केल्याने आपल मनोदय व्यक्त केला होता. विशेष म्हणजे हदगाव विधानसभाक्षेञ हदगाव व हिमायनगर ह्या दोन तालुक्यात समाविष्ट असल्याने हदगावच्या प्रथम टोकापासुन ते हिमायनगरच्या शेवटच्या टोका पर्यत त्याचे चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे यामध्ये बहुसंख्य सर्वसामाजातील सर्वसामान्याची भरणा आहे. खा वानखेडे यांनी हदगाव विधानसभाक्षेञाच तीन वेळा हिगोली लोकसभेचा...
