International Women’s Day : जागतिक महिला दिन‌ श्री गुरू गोविंदसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा

नांदेड| जागतिक महिला दिना‌ निमित्त “श्री गुरुगोविंद सिंग जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे मा.डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मार्च ” जागतिक महिला दिन ” साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज रोजी अवयव दान जनजागृती व जागतिक श्रवण दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अवयव दान कसे केले जाते याबद्दलची पूर्ण प्रक्रिया डॉ.वैष्णवी कुलकर्णी,बधीरीकरण विभाग प्रमुख डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ” जागतिक श्रवण दिन “बद्दल श्रवणदोष का येते व काळजी काय घ्यायची याबद्दलची मार्गदर्शन डॉ.अश्विन लव्हेकर कान,नाक व घसा तज्ञ यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत पाटील, डॉ. एच.के. साखरे,डॉ.पुष्पा गायकवाड तसेच मेट्रन श्रीमती राठोड, सर्व विभागाच्या इन्चार्ज सिस्टर, परिचर्या प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय नांदेड येथील प्राचार्य श्रीमती बोथीकर व सर्व शिक्षक व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी हे सर्व उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल उदगीरकर व ज्योती पिंपळे यांनी केले. महिला दिनानिमित्त मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सर्व उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व महिलांबद्दल चे आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर श्रीमती हळदेकर व श्रीमती विद्या बापते यांनी देखील महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी व रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांचे व नातेवाईकांचे आभार मानून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button