Homeनांदेडजिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बाबत आय जी उमाप साहेब यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत...

जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बाबत आय जी उमाप साहेब यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीमचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

नवीन नांदेड l मागील सप्टेंबर महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यात मध्ये 36 पोलीस स्टेशन पैकी उत्कृष्ट कामगिरी बाबत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीम यांना उत्कृष्ट कामा बाबत दोन प्रशस्तीपत्र देऊन आय जी शहाजी उमाप यांनी अभिनंदन केले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी मध्ये अनेक गुन्हेगारांना प्रतिबंध करून त्यांना एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी जेलमध्ये पाठवले, अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले, इतर गुन्हेगार व दारू विक्रेते यांच्यावर उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई केली म्हणून पोनि चिंचोलकर पीएसआय कुसमे पोलीस अंमलदार तेजबंद यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच नांदेड ग्रामीण हद्दीतील जास्तीत जास्त समन्स बजावणी करून 92% पेक्षा जास्त समन्स बजावणी केली व जास्तीत जास्त साक्षीदार यांना कोर्टात हजर केले म्हणून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडे, जगताप, जाधव यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या वर्षात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण पोलिसांच्या विविध हेड खालील उत्कृष्ट कामगिरी संबंधाने चार वेळा प्रशस्ती पत्र देऊन गौरव केलेला आहे. पोनि चिंचोलकर यांच्या कार्यकाळा मध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारांवर वचक बसली असून गुन्हेगारी कमी झालेली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments