नांदेड l भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचेवरील हल्लेखोरास त्वरित गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी महिला समता परिषदेच्या शिष्टमंडळाने भारताच्या राष्ट्रपतीकडे केली आहे.


अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय गुरु रविदास महिला समता परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर यांचे मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण रामकिशन गवई यांचेवर भर न्यायालयात एका सनातनी वकिलाने चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीस अटक करुन लगेच सोडून देण्यात आले.


याबद्दल गवई यांनी कांही तक्रार केली नसली तरी तेथे उपस्थित पोलिसांनी देशद्रोहाचा एफ. आय. आर. दाखल करुन आरोपीस पुन्हा अटक करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी मंगल दुधंबे, पारुबाई सोनकर, गंगासागर कमलेश्वर, पद्मा सोनटक्के, श्रीनिवास कांबळे, लक्ष्मण सोनकर, चंद्रसेन गंगासागरे, लक्ष्मण वाघमारे, आनेजी शहारे, सुरेश वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.




