International Women’s Day : जागतिक महिला दिन श्री गुरू गोविंदसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा
नांदेड| जागतिक महिला दिना निमित्त "श्री गुरुगोविंद सिंग जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे मा.डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मार्च " जागतिक महिला दिन " साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज रोजी अवयव दान जनजागृती व जागतिक श्रवण दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अवयव दान कसे केले जाते याबद्दलची पूर्ण प्रक्रिया डॉ.वैष्णवी कुलकर्णी,बधीरीकरण विभाग प्रमुख डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच " जागतिक श्रवण दिन "बद्दल श्रवणदोष का येते व काळजी काय घ्यायची याबद्दलची मार्गदर्शन डॉ.अश्विन लव्हेकर कान,नाक व घसा तज्ञ यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत पाटील, डॉ. एच.के. साखरे,डॉ.पुष्पा गा...
