लोहा l लोह्यात लाडकी बहीण स्नेह मेळावा अभूतपूर्व गर्दीने फुलून गेला होता. लोहा पारडीच्या विक्की गार्डन मध्ये सगळीकडे महिलांचा महिला होत्या.


तोबा गर्दी पाहून महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ प्रभावित झाल्या अन त्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही पारडी च्या विक्की गार्डन मध्ये भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी” लाडकी बहीण-स्नेह मेळावा “आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी भाजपाचे विधान परिषद गटनेते आ प्रवीण दरेकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते ऍड गणेश हाके, माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रवीण साले यासह छत्तीसगड भाजपा प्रवास प्रभारी भारत मंडीयारा यासह मान्यवर उपस्थित होते.


लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ प्रतापराव प्राणिताताई यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नियोजित वेळे नंतर दीड तास उशीर झाला खरा . पण राज्यातील इतर स्नेह मेळाव्यांच्या तुलनेत लोह्यातील महिलांची गर्दी अभूतपूर्व होती.


“लाडक्या बहिणींचा उत्साह प्राणिताताईंशी त्याचे असलेली थेट ओळख ताईंचा प्रेमळ प्रतिसाद सहज पारिवारिक संवाद सुख दुःख अन रक्ताच्या नात्या पेक्षाही आदरभाव स्नेहाची घट्ट झालेली वीण” राजकारणाच्या पल्याड होती. कोणत्याही पदावर नसताना केवढा जिव्हाळा मतदारांचा चिखलीकर कुटुंबावर आहे.

आपुलकी आदर आपलेपणा हे सगळं प्रदेशाध्यक्षा। चित्रा वाघ यांनी पाहिले त्या भारावून गेल्या भाषण संपताच आ प्रवीण दरेकर गणेश हाके प्रतापराव यासह मान्यवर स्टेज खाली उतरले प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना सेल्फी काढण्याचा मोह टाळता आला नाही.
यांनी प्रमुख नेते व प्राणिताताईंच्या समावेश सेल्फी काढला मेळाव्यात अलोट गर्दी पाहू बहुत बधिया व्हेरी गुड प्राणिताताई “मला आपला अभिमान वाटतो” अशी शाब्बासकी थाप त्यांनी दिली. पक्ष संघटनेत आणि गावपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे सर्वात मोठी बबक्षीस मानले जाते…!


