हिमायतनगर| तालुक्यातील सिरंजनी बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, चिखलातून महामंडळाच्या बसला जाणे येणे अक्षरशः बंदच पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी येथील युवकाच्या मदतीने या अंतर्गत रस्त्यावर रेती, सिमेंटने खाद्याचे बांधकाम करून मुरूम अंथरून रस्ता सुरळीत केला. सिरंजनी येथील युवकांनी आपल्या श्रमदानातून या रस्त्याची डागडुजी केली असल्याने येथील सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड व त्यांच्या मित्र परिवाराचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे.
सिरंजनी येथील शालेय विद्याथ्यानींना शिक्षणासाठी हिमायतनगरला येण्या जाण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू आहे. या वर्षीच्या आतापर्यंतच्या पाऊस काळात दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस बरसला. परिणामी सिरंजनी बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, रस्ता खड्डेमय झाला आहे. या अंतर्गत रस्त्यावरून बस जाणे येणे शक्य नसल्याने बस सेवा काही दिवसांपासून बंदच होती. तसेच येथील पाईपलाईनच्या ठिकाणी मोठे भगदाड पडले होते, त्यामुळे बस जाण्यासाठी अडचण होत होती. हि बाब लक्षात घेऊन अखेर सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी सिरंजनीच्या जागरुक नव युवकांस सोबत घेऊन या अंतर्गत रस्त्याची डागडुजी केली. आणी या रस्त्यावर बस जाण्या येण्यासाठीचा आता मार्ग मोकळा करून दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. आणी ईकडे सिरंजनीच्या भावानी लाडक्या बहिणींच्या शिक्षणाची परवड थांबवली. म्हणून पंचक्रोशीत या लाडक्या भावांचे मात्र सिरंजनीसह पंचक्रोशीत मोठे कौतुक होत असून, शासनाने जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागात हा रस्ता समाविष्ट करून या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून हा अंतर्गत रस्ता कायमस्वरूपी रहदारीसाठी मोकळा करून द्यावा. अशी मागणी सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.