नांदेड| नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 37 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. आज पावेतो 26 टोळ्यामधील 79 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन, MPDA अंतर्गत 16 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.


पोलीस ठाणे विमानतळ यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शशिकांत सखाराम भडगळ वय 22 वर्ष राहणार कर्मविरनगर, नांदेड याचेवर गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमा प्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त सादर करण्यात आला होता.


पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती सिध्द झाल्याने आरोपी नामे शशिकांत सखाराम भडगळ वय 22 वर्ष राहणार कर्मविरनगर, नांदेड यास एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद आरोपीस मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 16 गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 17 झाली आहे.




