An inveterate criminal | एक अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात -NNL
नांदेड| नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 37 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. आज पावेतो 26 टोळ्यामधील 79 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन, MPDA अंतर्गत 16 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे विमानतळ यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शशिकांत सखाराम भडगळ वय 22 वर्ष राहणार कर्मविरनगर, नांदेड याचेवर गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल अस...
