HomeनांदेडNo basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! "तर" आम्हाला ग्रामपंचायत कशाला;...

No basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! “तर” आम्हाला ग्रामपंचायत कशाला; वाळकेवाडी येथील वडार समाज अनेक सुविधांपासून कोसो दूर -NNL

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी ही ११ सदस्य असलेली ग्रामपंचायत असून, वार्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत आवश्यक त्या मूलभूत सुविधा देत नाही. तशी ग्रामपंचायत काय..? कामाची असा संतप्त सवाल वाळकेवाडी येथील वडार समाज बांधवांने केला आहे.

वाळकेवाडी/हिमायतनगर,शंकर बरडे| हिमायतनगर गटविकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वाळकेवाडी गावात रस्ते,घरकुल व सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करीत आहेत. याचा सतत पाठपुरावा करुनही याकडे संबंधित अधिकारी – पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आसल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर व ग्रामविकास अधिकारी यांना दुधड-वाळकेवाडी येथिल समाज बांधवांने निवेदन देऊन आपल्या समस्या कळविल्या आहेत. जी ग्रामपंचायत आम्हाला नागरी सुविधा देत नाही तशी ग्रामपंचायत काय..? कामाची असा संतप्त सवाल वाळकेवाडी येथील वडार समाज बांधवांने केला आहे.

याबाबत सविस्तर व्रत असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड-वाळकेवाडी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्र ४ मध्ये वडार समाजाची संख्या जवळपास ४५० ते ५०० आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या समाजाकडे फक्त एक मतदार म्हणून पहिले जाते. आमच्या समुहातील नागरिकांना एकालाही एकही घराकुल दिले नाही, घरकुलच नाही तर कुठलिही सुविधा ज्यात नाली, रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन, कोणतीही मूलभूत सुविधा आम्हाला दिली जात नाही.

IMG 20240709 WA0071 No basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! "तर" आम्हाला ग्रामपंचायत कशाला; वाळकेवाडी येथील वडार समाज अनेक सुविधांपासून कोसो दूर -NNL

आम्ही सर्व वडार समाजाने ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच यांना वारंवार बोलावून घेऊन सर्व समस्या सांगितल्या. पण आमचे म्हणणे कोणीही ऐकून घेयला तयार नाही. आमच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने कधी-कधी वाटते आम्ही गावाचे रहिवाशी आहोत कि..? नाही. कारण गेल्या अनेक पिढ्यापासून आम्हाला ग्रामपंचायतच्या जे काही भौतिक सुविधा मिळतात त्या पासून वंचित ठेवले जाते. या गोष्टीचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना देखील संबंधित ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी आमची दख्खल घेत नाहीत.

त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतच्या विरोधात पंचायत समिती कार्यालय गाठावे लागले आहे. ग्रामपंचायत स्तरावर जे काही सुविधा असतील ते पूर्ण द्याव्यात अन्यथा आम्हाला लोकशाहीचा मार्ग अवलंबावा लागेल. असा इशाराही गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी निवेदन कर्ते, संजय डुकरे, अनिल डुकरे, बालाजी देवकर, बबलू गायकवाड, राजू शिंदे, रामू धोत्रे, दिलीप वाघमारे, अजय आलेवाड, प्रमेश्वर आलेवाड, विजय डुकरे, अजय डुकरे, साईनाथ देवकर, बाबू देवकर, गोविंद देवकर, अमोल शिंदे, व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments