नांदेड। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेने कर्जदार व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असल्याने ९०० कोटीच्या ठेवीचा उच्चांक गाठू शकले,त्यामुळे हि शाखा अभिनंदनास पात्र ठरली आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ सुनिल कदम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेचा ७ वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा करण्यात आला.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ सुनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमास नानक साई फाउंडेशनचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,सिध्दी शुगरचे अध्यक्ष अँड अविनाश जाधव, राज्य सहकारी बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश मुसळे, श्री गुरु गोबिंदसिंघ जी अभियांत्रिकीचे डीन संजय देठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण किनगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्य सहकारी बँकेच्या यशाची घौडदौड सुरु असून बँकेने ५७२६५ कोटीचा उच्चांकी व्यवसाय केला आहे,बँकेचे ४५६० कोटीचे नक्त मूल्य व ६१५ कोटीचा निव्वळ नफा असल्याची माहिती बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश मुसळे यांनी यावेळी दिली.
बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर,व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे,मुख्य सरव्यवस्थापक अशोक माने तसेच सरव्यवस्थापक भुईभार,जाधव, श्रीमती कोरडे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली बँक प्रगतीचे नवनवीन उच्चांक पार करीत असल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक मुसळे यांनी सांगितल
प्रारंभी शाखा व्यवस्थापक प्रकाश बोकारे यांनी प्रास्ताविक केले. ९०० कोटीचे डिपॉजीट असलेली नांदेड ची शाखा असून बॅंकेमार्फत सोलार,चार चाकी वाहन,घर कर्ज दिली जातात, गरजवंतानी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक प्रकाश बोकारे यांनी केले.
वर्धापन दिन सोहळा येशस्वीतेसाठी कमलाकर मोरे,भारत पाटील,सुरेश कदम,विजय सूर्यवंशी,पांडुरंग बोकारे, संकेत अंभोरे, सचिन चौरे,वैशाली देवठाणकार,शीतल वडगावे, प्रतिक्षा काळे,अनिता वाघमारे, रावसाहेब कदम यानी परिश्रम घेतले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शाम पाटील, सरव्यवस्थापक प्रफुल्ल होणराव,सिध्दी शुगरचे बी एम राठोड, कपिश्वर शुगर चे कार्यकारी संचालक महादेव घोरपडे, सूर्यकांत वेदपाठाक, आनंद पाटील, पूर्णा चे कार्यकारी संचालक सुनील दळवी,शेखर दिवाकर, अविनाश सूर्यवंशी, निवळे पाटील,ग्राहक खातेदार, ठेवीदार मोठ्या संखेने उपस्थित होते.