राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेने ठेवीदारांच्या विश्वास संपादनामुळे ९०० कोटीच्या ठेवी- डॉ.सुनिल कदम -NNL
नांदेड। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेने कर्जदार व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असल्याने ९०० कोटीच्या ठेवीचा उच्चांक गाठू शकले,त्यामुळे हि शाखा अभिनंदनास पात्र ठरली आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ सुनिल कदम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेचा ७ वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा करण्यात आला.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ सुनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमास नानक साई फाउंडेशनचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,सिध्दी शुगरचे अध्यक्ष अँड अविनाश जाधव, राज्य सहकारी बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश मुसळे, श्री गुरु गोबिंदसिंघ जी अभियांत्रिकीचे डीन संजय देठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण किनगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्य सहकारी बँकेच्या यशाची ...
