नांदेड| मिशन निर्भया अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी अवैध मसाज सेंटर, स्पा सेंटर व लॉजेसवर एकाच दिवशी धडक छापे टाकत 16 आरोपींना अटक केली.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. अविनाश कुमार (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद, भाग्यनगर, सोनखेड आणि माहूर पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली.


🔹 वजिराबाद: The Fusion Spa येथे बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री करून 6 आरोपींना अटक.
🔹 भाग्यनगर: Red Oak Spa व एका घरावर छापा; एकूण 7 आरोपी अटकेत.
🔹 सोनखेड: पर्णकृषी पर्यटन केंद्रावर कारवाई; कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग, 1 आरोपी अटकेत.
🔹 माहूर: राजश्री लॉज वर छापा; नोंदी व ओळखपत्राशिवाय रूम दिल्याप्रकरणी 2 आरोपी अटकेत.


पोलीसांनी सांगितले की, यापुढे जिल्ह्यातील सर्व मसाज सेंटर, स्पा, लॉज, हॉटेल्स व कॉफी शॉप्सचे नियमित तपासणी होणार आहे. कुठल्याही अवैध व्यवसायाबाबत माहिती असल्यास स्ट्रिट सेफ्टी पथकाचे सपोनि भागवत नागरगोजे – 8999311947 किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.



