हिमायतनगर। डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे मातंग समाजाच्या उन्नती साठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांचे विचार घराघरात पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहीजे. प्रत्येकाने अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची गाव तिथे शाखा स्थापन करून मातंग समाजाच्या चळवळीला बळकटी द्यावी. असे अवाहन अण्णाभाऊ साठे क्रांती सेने चे जिल्हाध्यक्ष पंडीत वाघमारे यांनी केले.
हिमायतनगर येथे शनिवार ता. ७ शासकीय विश्रामगृहात अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या गाव तिथे शाखा स्थापन अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते एन. जी. पोतरे हे होते. पुढे बोलतांना जिल्हाध्यक्ष वाघमारे म्हणाले की, समाजाची चळवळ गतीमान करण्यासाठी सर्वानी एकजुटीने काम करण्याची गरज असून, राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन भाऊ साठे यांची राजकीय भुमिका महत्वपूर्ण राहीली आहे. लोकसभेत महाविकास आघाडी सोबत गेल्याने महाराष्ट्रात आघाडीचे खासदार जास्त प्रमाणात निवडून गेले.
तर विधान सभेत महायुतीला समर्थन दिल्याने महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली त्यातात मातंग समाजाचे मोठे योगदान असल्याचे ही या वेळी जिल्हाध्य वाघमारे म्हणाले.आणी म्हणून सचिन भाऊ साठेची राजकीय भुमिका निर्णायक ठरली आहे. यापुढे आपण सर्वानीच संघटनात्मक बांधणी साठी काम केले पाहीजे. गाव तिथं शाखा या अभियानांतर्गत आपण स्वतःला झोकून देऊन काम करूण संघटनेला अधिक प्रमाणात बळकटी द्यावी. असे ही वाघमारे यांनी सांगीतले.
अध्यक्षीय समारोप करताना एन. जी. पोतरे म्हणाले की, युवकांनी आपल्यातील मरगळ झटकून संघटनेसाठी काम केले पाहीजे. समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. अल्पशिक्षणावर आपली गाडी थांबते. हे आता थांबले पाहीजे. उच्चशिक्षण महत्वाचे असून, परिस्थिती वर मात करून आपले धेय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन जिवनात प्रगती साधावी. शिका संघटीत व्हा. आणी संघर्ष करा. संघटीत होणे आता काळाची गरज असून सर्व नवयुवकानी संघटनेसाठी काम करून आपले आदर्श अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असणाऱ्या त्यांच्याच वारसाला, सचिन भाऊ साठेला साथ देवून त्यांचे हात बळकट करावे. असे अवाहन एन.जी. पोतरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुंडेकर यांनी केले. तर अभार तालुकाध्यक्ष संदिप गुंडेकर यांनी मानले. यावेळी महिला आघाडीच्या द्रोपता बाई कांबळे, जिल्हाकार्यध्यक्ष संजय बोथीकर, संतोष बनसोडे, संतोष हातवेगळे, चांदराव गायकवाड, विठ्ठल ऐरणकर पांडुरंग गाडगे, दत्ता शिराणे, बालाजी बनसोडे, गजानन वाघमारे, बालाजी शिराणे, सुरेश तपासकर, नितीन मेहेत्रे, विकास मनपुर्वे, सुदर्शन बरकमकर, मारोती गाडेकर, प्रशांत निमलवाड, विकास गोरे, परमेश्वर सोळंके, नारायण शिंदे, बाबाराव बनसोडे, मारोती वाघमारे, विनोद वांगे, आकाश गुंडेकर, कुणाल वाघमारे, आदिंसह समाज बांधवांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.