नांदेड| 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आज नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिवस साजरा करण्यात आला..
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रवीण घुले, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, महिला बालकल्याण विभागचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे आदींची उपस्थिती होती.
सुरवातीला घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.