नांदेड l सामाजिक बांधिलकी जोपसत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तरोडा नाका नांदेड येथील वृत्तपत्र विक्रेते बांधवांना संघटनेच्या वतीने दिपवाली निमीतीने फराळाचे वाटप करण्यात आले.
तरोडा नाका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन निमित्ताने परिसरात हिवाळा उन्हाळा पावसाळा बारामाही पेपर संकलन करून वाटप करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेते यांना सामाजिक बांधिलकी जोपासत जवळपास 100जणांना दिवाळी फराळाचे वाटप अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष प्रशांत धाकपाडे,सचिव योगेश मुर्खावार, सहसचिव मारूती गायकवाड, कोषाध्यक्ष मारूती सुर्यवंशी, सदस्य राजेश्वर लोकरे, चेतन चौधरी,राम पवार,विजय
कल्याणकर,एकलारे,दता झाडे, तिडके,बुक्तरे, नरवाडे,कौठेकर, स्वप्निल बैनवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले,या उपक्रमाचे वृतपत्र विक्रेते बांधव कुटूंबियांनी व परिसरातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.