नांदेड| नांदेड दक्षिण मतदार संघातील जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या जागेवर भाजपने दावा केला आहे, तर दुसरीकडे शिंवसेनेचा हा मतदार संघ बाल्लेकिल्ला आहे, त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन ठराव घेतला आहे.
2019 मध्ये भाजपमुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला होता. भाजपने गद्दारी केली होती, मागच्या निवडणुकीत जी चूक केली ती यावेळेस आम्ही कदापि सहन करणार नाही. असा इशारा शिवसैनिकांनी भाजपाला दिला आहे. नांदेड दक्षिणची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी आणि पक्षात आलेल्या उपऱ्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. त्यामुळे आगामी काळात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.