किनवट, परमेश्वर पेशवे| शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किनवट माहूर विधानसभा उपाध्यक्षपदी कोसमेट येथील अन्वर अब्दुल शेख यांची निवड करण्यात आली असून माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता ताई पाटील व माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर व माजी आमदार प्रदीप नाईक तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या हस्ते अन्वर अब्दुल शेख यांना नियुक्ती देण्यात आले आहे.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा किनवट येथे नुकताच संपन्न झाला असून या पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी भाजपाच्या व इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील व माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून किनवट माहुर मतदार संघातील भाजपाच्या व इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस एक करत प्रमाणिकपणे काम करण्याऱ्यांच्या कामांची दखल घेत अशा अनेकांना विविध पदावर प्रति नियुक्ती पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले त्याच बरोबर कोसमेट येथील अन्वर अब्दुल शेख यांची देखील किनवट माहुर विधानसभा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करुन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील व माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते अन्वर अब्दुल शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असता अन्वर अब्दुल शेख यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले की किनवट माहूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मताची टक्केवारी कशी वाढवता येईल यासाठी सर्वात जास्त लक्ष दिले जाईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांना अधिक मतांने कसे निवडून आणता येईल यासाठी किनवट माहूर विधानसभा उपाध्यक्ष या नात्याने माझा प्रयत्न राहील असे अन्वर अब्दुल शेख यांनी याप्रसंगी बोलून दाखवले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर,जांभरूणकर बी डी, प्राध्यापक महनोदिन मिना पेठवडकर,विश्वांभर भोसीकर समाधान जाधव, साजिद खान किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे गजानन मुंडे पाटील, इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील, दत्तराव मोहिते.मनोज किर्तने,अनिल पाटील कराळे, उपसभापती रोहिदास चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर दहिफळे,अरूण आळणे, बालाजी बामणे, शिवराम जाधव,मनोज राठोड,भोजराज देशमुख. डॉ भगवान गंगासागर,शेख जब्बार, रोशन खान पठाण,दिलीप जमादार,गरजू पाटील सोळंके,श्याम साखरे,शिवाजी जंगिलवाड,माजी सरपंच मारोती गड्डमवाड, यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.