नवीन नांदेड| सिडको परिसरा नजीक असलेल्या औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिला लागलेल्या आगीत पाच जण होरपळून गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ,तर तिन आग्नीशामक दलाच्या गाड्यानी आगीवर नियंत्रन मिळवले आहे. ही आग कशामुळे लागली हे अध्याप स्पष्ट झाले नाही, घटनास्थळी नांदेड दक्षिण विधानसभेचे नवनिर्वाचित आ. आनंदराव बोंढारकर, नांदेड तहसिलदार पांडे,उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली .
सिडको नांदेड – उस्मानगर रस्त्यालगत असलेल्या औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिलला अचानक आग लागल्याची घटना दि १ डिसेबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली,या घटनेत कंपनीचे मालक भास्कर कोतावार , सुमत बंडेवार,हर्षद कोतावार,सुधाकर बंडेवार, विनोद कोत्तावार हे जखमी झाले .त्यांना तात्काळ नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ,यात दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली .
हि आग इतकी भिषण होती आगीने काही क्षणात रोद्ररुप घेतले होते. परंतु घटनेची माहीती कळताच अग्नीशामक दलाच्या पथकांनी तिन गाड्यांच्या सहाय्यानी हि आग आटोक्यात आणली. या आगीत तिरुमला कंपनीच्या तृप्ती आँईल या नावाने चालणाऱ्या आईलचे मोठे नुकसान झाले. हि आग कशामुळे लागली हे अध्याप स्पष्ट झाले नसले तरी दि १ डिसेबर रोजी रवीवार असल्याने या कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे या कंपनीत कामगार कामावर आले नव्हते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात जिवितहाणी टळली असल्याची चर्चा या ठिकाणी होती. या कंपनीत रोज तिस ते चाळीस कामगार काम करत असतात आज सुट्टी असल्याने केवळ टेप्पो या ठिकाणी आँईल नेण्यासाठी आला होता. तो टेप्पो क्रं ( एम एच २६ सी एच ०७०० ) हा आगीत भस्मसात झाला आहे, या आगीत किती नुकसान झाले. ते अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी मोठ्याप्रमाणात आईलमिल या आगीत जळाले असल्याचे दिसुन येते .
या घटनेची माहीती होताच परिसरात असलेले नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आ.आनंदराव बोंढारकर , जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे ,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे ,शहरध्यक्ष तुलजेश यादव, भाजपाचे वैजनाथ देशमुख,सौ.निकीता शहापुरवाड यांनी जखमीना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहीती मिळताच नांदेड तहसिलदार पांडे ,उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक पोलिस निरीक्षक ओमकांन्त चिंचोलकर ,मंडळ अधिकारी जगताप यानी भेट देऊन माहीती घेतली ,या घटनेची माहीती सिडको – हडको परिसरात कळताच अनेक नागरिकांनी संबंधित आईल मिल कडे धाव घेतली होती. उस्मानगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमाक दलाचे अधिकारी के.एस.दासरे, यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कांबळे साहेबराव नरवाडे, उमेश ताटे, शिंदे, किरकण, कदम यांनी दोन अग्निशमक गाड्यांच्या सहाय्याने तर औद्योगिक वसाहतीचा एक अग्निशमक गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.