नांदेड। श्री स्वामी समर्थ मंदिर तथा अन्नछत्र विश्वस्त मंडळ सोमेश कॉलनी नांदेड,फेस्कॉम उत्तर मराठवाडा विभाग,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा तथा शहर ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिति यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश कॉलनी नांदेड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त, जगातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सामूहिक “ज्येष्ठ माय-बाप वाढ दिवस” साजरा करण्यात आला.
प्रास्ताविकात डॉ.हंसराज वैद्य म्हणाले की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन एक आक्टोबर हा जगभर साजरा केला जातो.या दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात देशासाठी सामाजिक, सांस्कृतिक, अर्थिक, शैक्षणिक, भौतिक, औधोगिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, आरोग्य, कला, क्रिडा, संगित, कृषी, संरक्षण, तथा देशाच्या एकून सर्वच क्षेत्रात राष्ट्र निर्मितीत सरळ तथा इतर आवांतर मार्गानी दिलेला सहभाग, उपसलेले कष्ट, सोसलेल्या हाल आपेष्टां,केलेला त्याग तथा समर्पण याची नोंद घेऊन जागतिक पातळीवर त्यांचे स्मरण करून ऋण व्यक्त केले जाते.विविध क्षेत्रात असामान्य तथा विशेष कामगिरी केलेल्या हयात ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधीक स्वरूपात खास समारंभात त्याचे गुण गौरव करून विशेष व्यक्तींच्या करवी त्यांचे कौतूक करून ऋण व्यक्त केले जाते,त्यांचा सत्कार केला जातो.त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली जाते व ईतरांना प्रोत्साहित केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून,त्यांचे प्रश्न मांडताना प्रलंबित मागण्यांचा व मानधनाचा प्रश्नही डॉ.हंसराज वैद्य यांनी नांदेड उत्तर विधान सभाचे आ.बालाजीराव कल्याणकर यांच्यापूढे मांडला.
ते म्हणाले आम्ही प्रातिनिधीक स्वरूपात गरिब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, निराधार,विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ माय-बाप यांनाच निमंत्रीत केलेले आहे. हजारो ज्येष्ठ लाडके माय-बापांचा एक प्रातिनिधीक स्वरूपाचा अगळा-वेगळा सामुहिक तथा भव्य दिव्य असा “ज्येष्ठ लाडके माय-बाप वाढ दिवस” आयोजित केला आहे.
आमदार मा.बालाजीराव कल्याणकर यांच्या शूभ हस्ते तर ज्येष्ठ नागरिकांचे आधारस्तंभ मा.श्री. व सौ. बार्हाळे, ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते तथा उद्योग पती नविनभाई ठक्कर, अर्थक्रांती राष्ट्रीय अर्थिक साक्षरता मंचचे अध्यक्ष विजय देशमुख (लातूर), मा. बी.आर. पाटील (लातूर), निवृत्त समाज कल्याण अधिकारी मा.बापू दासरी,यांच्या व अनेक सुहृदयी स्नेही संयोजक तथा आयोजकांच्या प्रमुख उपस्थित, नांदेड येथील दिग्गज गायक तथा ज्येष्ठ पत्रकार विजय बंडेवार,शिवहर तोडकरी,गनी चौधरी, नांदेडच्या गान कोकीळा मेघा गायकवाड यांच्या सामूहिक स्वरात तथा संगितमय धून सह “हॅपी बर्थ डे” च्या गजरात ,खास सजविलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या भव्य मंडपात उपस्थित महिला षुरूष ज्येष्ठांच्या साक्षीने व प्रचंड टाळांच्या गजरात हा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.
“ज्येष्ठ माय-बाप वाढदिवस” सोहळ्यात मा.आमदार बालाजी कल्याणकर अक्षरश: भान हरवून पूर्ण वेळ रमले! भाराऊन जाऊन मनमोकळे करताना म्हणाले माझ्या ज्येष्ठ माय-बापांचे प्रलंबित प्रश्न व ज्येष्ठ लाडके माय-बाप योजनांतर्गत मान धन मिळवून देण्यास मी कटीबद्ध आहे! श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्र विश्वस्त मंडळानी मा.आमदार साहेबासह आलेल्या सर्व ज्येष्ठ लाडक्या माय-बापानांही प्रसादरूपी स्नेह भोजन दिले. सोहळा अत्यंत आनंद दायी कायम स्मर्णात राहिल असा ठरला.