लोहा| शहरात नाली सफाई व स्वच्छता याकडे तात्काळ लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून घंटागाडया वाढविण्यात आल्या आहेत तसेच पाणी पुरवठा शुद्ध व्हावा यासाठी संबधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.पाण्याचा अपव्यय करून नये तसेच घरकुल लाभार्थ्यांना लवकरच अनुदान मिळणार आहे.शहरातील जनतेनी वेळेत कर भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुक काळात मुख्याधिकारी म्हणून श्रीकांत लाळगे यानी पदभार स्वीकारला निवडणूक पार पडल्यानंतर गतिमान प्रशासन व्हावे व शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधामिळाव्यात यासाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. काही महिण्या पासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे कामात शिथिलता आली होती. पण राज्यातील नागरी वस्ती असलेल्या मोठ्या नगर पालिकेचे प्रभावी प्रशासनाचा अनुभव असलेल्या मुख्याधिकारी श्री लाळगे यांनी शहरासाठी विविध योजनां राबविण्याचा मनोदय पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत व्यक्त केला.
शहरातील प्रलंबित घरकुल योजनेला दोन कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून लवकरच लाभार्थ्यांना उर्वरित हप्ता दिला जाईल .तसेच शहरातील स्वच्छता बाबत घंटागाड्या वार्ड निहाय पुन्हा फिरणार आहेत तसेच नाली सफाई व स्वच्छता या अनुषंगाने संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा शुद्ध व्हावा यासाठी पाणीपुरवठा विभागाला निर्देश दिले आहेत.शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यवय थांबवावा तसेच नगर पालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी मालमत्ता कर पुनर्मुल्यांकन करण्याचे संकेत त्यानी दिले.
नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा नळाला तोट्या बसवाव्यात व पाणी बचत करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केले. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्री लाळगे यांचा लोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरवासियांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.