HomeनांदेडEncroachment Removal Campaign : शहर वाहतूक शाखा व नांदेड वाघाळा महानगर पालीकाकडुन...

Encroachment Removal Campaign : शहर वाहतूक शाखा व नांदेड वाघाळा महानगर पालीकाकडुन अतिक्रमण हटाव मोहीम -NNL

नांदेड| शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दूर करण्यासाठी, बेशिस्त व वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहन चालकावर व शहरातील अनाधिकृत अतिक्रमण विरुध्द कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आदेश दिले होते.

दिलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक 10/12/2024, दि.11/12/2024 रोजी वजिराबाद चौक ते कलामंदिर पर्वत विशेष मोहीम राबवून डॉ. लाईन समोर फुटपाथवर अतिक्रमन करुण बसलेले किरकोळ कपडे विक्रते, कटलेरी विक्रर्ते तसेच वजिराबाद चौक ते एस.टी. ओव्हर ब्रिज पर्यंतचे फळ विक्रते, ‘भाजीपाला विक्रते हातगाडे काढुण टाकण्यात आले. तसेच दुकाना समोर ठेवण्यात आलेले पाटया, साहित्ये अतिक्रमण काडण्यात येवुन दुकाना समोर बेशिस्त पणे पाकींग केलेले वाहनांवर दडात्मक कार्यवाही करण्यात आली.

IMG 20241212 WA0035 Encroachment Removal Campaign : शहर वाहतूक शाखा व नांदेड वाघाळा महानगर पालीकाकडुन अतिक्रमण हटाव मोहीम -NNL

सदर मोहीमे मध्ये शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री साहेबराव गुट्टे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. बळवंत जमादार, पोउपनि श्री भंडारे व ट्राफीक अंमलदार, दंगानियंत्रण पथक, नांदेड वाघाळा शहर नगर पालीका यांचे अतिक्रमन पथका सोचत संयुक्त कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच शहरात वाहतूकीचे नियम मोडणा-या 182 वाहन चालकावर कारवाई करुन त्यांचे कडून 243,750/-रु दंड करण्यात आला. तसेच 79 अणपेड चलनाचे वाहन चालका कडूण 48,250 / रु दंड वसुल करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments