Encroachment Removal Campaign : शहर वाहतूक शाखा व नांदेड वाघाळा महानगर पालीकाकडुन अतिक्रमण हटाव मोहीम -NNL
नांदेड| शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दूर करण्यासाठी, बेशिस्त व वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहन चालकावर व शहरातील अनाधिकृत अतिक्रमण विरुध्द कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आदेश दिले होते.
दिलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक 10/12/2024, दि.11/12/2024 रोजी वजिराबाद चौक ते कलामंदिर पर्वत विशेष मोहीम राबवून डॉ. लाईन समोर फुटपाथवर अतिक्रमन करुण बसलेले किरकोळ कपडे विक्रते, कटलेरी विक्रर्ते तसेच वजिराबाद चौक ते एस.टी. ओव्हर ब्रिज पर्यंतचे फळ विक्रते, 'भाजीपाला विक्रते हातगाडे काढुण टाकण्यात आले. तसेच दुकाना समोर ठेवण्यात आलेले पाटया, साहित्ये अतिक्रमण काडण्यात येवुन दुकाना समोर बेशिस्त पणे पाकींग केलेले वाहनांवर दडात्मक कार्यवाही करण्यात आली.
सदर मोहीमे मध्ये शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री साहेबराव गुट्टे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. बळवंत जमादार, पोउपनि श्री भंडारे...
