नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा अभावी एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक विभागाच्या पदभार असल्याने जन्म मृत्यू यासह विविध विभागांतील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांनी मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असुन कर्तव्यदक्ष क्षेत्रीय अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित विभागातील कर्मचारी यांच्या कडे असलेला ईतर पदभार काढुन नियमित जन्म मृत्यू प्रमाण पत्र नियमित देण्यात यावे अशी मागणी नागरीकातुंन होत आहे.
नावामनपाच्ये आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी संबंधित विभागाकडून होत असलेल्या तक्रारी दखल घेत गेल्या चार महिन्यां पुर्वी तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेशीत केले होते,या प्रमाणपत्रावर संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यी डिजीटल स्वाक्षरी मुळे तात्काळ प्रमाणपत्र मिळु लागले , मात्र मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय हे अपवाद ठरले,या ठिकाणी दैनंदिन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत संबंधित जन्म मृत्यू प्रमाणपत्र विभागात जन्म मृत्यू प्रमाणपत्र साठी मात्र नोंद केल्या नंतर चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहे,या विभागातील संबंधित कर्मचारी यांच्या कडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसाय परवाना, गुंठेवारी, बांधकाम कामगार प्रमाण पत्र,यासह माहिती अधिकार, दैनंदिन टपाल हि कामे असल्याने जन्म मृत्यू प्रमाणपत्र कामे मात्र प्रलंबित आहेत, या कार्यालयात कर्मचारी तुटवडा असल्याने एका व्यक्तीला अनेक विभाग देण्यात आले आहेत.
सध्या जन्म प्रमाणपत्र दुरूस्ती साठी अनेक पालक या विभागात चकरा मारत असुन संबंधीत विभागातील कर्मचारी यांच्या कडे विवीध विभागांच्या पदभार काढून तात्काळ प्रमाणपत्र वितरीत करावे अशी मागणी होत आहे.