हिमायतनगर, अनिल मादसवार| सद्यस्थितीला होत असलेल्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे व मानवी आरोग्याचे नुकसान होते आहे. शेती व शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर सेंद्रिय व शाश्वत यौगिक शेतीकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी जागृत होऊन प्राकृतिक पद्धतीने शेती करावी. यासाठी यौगिक शेती करुन जीवन आनंदमय बनविण्याचा संकल्प सर्व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन ब्रम्हकुमारी शितल दीदी यांनी केले.
त्या हिमायतनगर येथील ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रच्या वतीने आयोजित राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शेतकरी बांधवांचा सन्मान व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होत्या. राष्ट्रीय किसान दिन कार्यक्रमाची सुरुवात भुमातेचे पूजन करून झाली. यावेळी उपस्थित कार्यक्रमात शेतीच्या स्वदेशी पद्धती आणि कमी खर्चात प्रदूषणमुक्त, सकस उत्पादन आणि दर्जेदार अन्न देणार उत्पादन कसे मिळवता येईल आणि आपल्या मातृभूमीला पुन्हा खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करून पुनरुज्जीवन कसे करावे. या नैसर्गिक आणि प्राचीन विषमुक्त शाश्वत शेतीमुळे आपण पर्यावरण असंतुलनाच्या आणि आपल्या आरोग्यविषयक समस्येवर नक्कीच आळा घालण्यात यशस्वी होउ अश्या शब्दात त्यांनी मार्गदर्शन करून सेंद्रिय व शाश्वत शेतीचे महत्व पटवून दिले.
यावेळी शहर व ग्रामीण भागातील सधन शेतकरी धनंजय तुप्तेवार, किरण बिच्चेवार, कल्याण वानखेडे, परमेश्वर इंगळे, एकनाथ डवरे, संदीप वानखेडे, श्यामराव गडमवार धानोरा यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक अकल्लवाड सर, काशीनाथ मेंडके, बाबुराव चौरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालक ब्रम्हकुमारी सिंधू दीदी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक भास्कवार, शरद चायल, गजानन चायल, नंदकुमार पळशीकर व हिमायतनगर येथील ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.