किनवट, परमेश्वर पेशवे| माजी आमदार प्रदीप नाईक यांचे शहरासह ग्रामीण भागात ‘आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? या आशयाचे फलक लावल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांचे चाहते मंडळी स्वतःहोऊन होर्डींग समोर उभे राहून फोटो घेण्याचा आग्रह करीत आहेत. आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर ग्रामीण जनता स्वतः नाईक साहेब किती चांगले आहेत हे खुद्द जनताच आपल्या तोंडून सांगत आहे.त्यामुळे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेच्या निवडणूका जस जशा जवळ येत तस तसे इच्छूक उमेदवारांनी खेडोपाडी, गाव,वाडी, तांड्यात बॅनर,होर्डींग्स लावले आहेत.परंतु प्रदीप नाईक यांच्या बॅनरला ग्रामीण भागातील जनता अधिक पसंती देतांना दिसत आहे. कोण निवडून येईल या बाबत गावातील चावडीवर, हॉटेल,पानटपर्यावर ग्रामीण भागातील नागरीक चर्चा करीत असून प्रदीप नाईक साहेबच चांगले आहेत,असे उदगार ग्रामीण भागातील नागरीक स्वतःहून काढीत आहेत.
प्रदीप नाईक यांची शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात मजबुत पकड आहे.त्यांना चाहणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.कारण होर्डींगवर लिहील्या प्रमाणे त्यांचे कर्तृत्व आहे. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या काळात अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांना घडविले आहे.अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.ते सामान्य नागरीकांनाही भेटतील त्या ठिकाणी स्वतःहून आवर्जून लोकांशी बोलतात संवाद साधतात.ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना आमदार स्वतः आम्हाला येवून बोलतात याचे नवल वाटणे साहजिक आहे. ते पानटपरी, साधे हॉटेल, रस्त्यावर किंवा त्यांच्या घरी असतांना ते जनतेला हसतमुखाने प्रेमाने बोलतात, त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवितात सुध्दा.
ते जनतेच्या स्वभावाशी खूप सुसंगत आहेत, एखादा सामान्य नागरीक असो किंवा एखादा सामान्य कार्यकर्ता असो त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत ते आपल्या घरी सुध्दा जेवायला घेऊन बसतात.यामुळेच त्यांची लोकप्रियता असून त्यांना यामुळे जास्तीत जास्त लोक चाहतात व कार्यकर्तेही त्यांच्या अधिक जिव्हाळ्याचे आहेत.या सर्व गोष्टी होर्डींग लावायला गेल्यानंतर प्रत्यक्ष ग्रामीण भागातील नागरीकांनी स्वतः प्रदीप नाईक यांचे बद्दल कौतूकास्पद शब्द बोलून दाखविले.असे सर्वेक्षण केल्यानंतर समजले.नव्हे अनुभव आला. तसे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे समर्थक कोमलदास भवरे यांनी केलेल्या सर्वेक्षणातून माजी आमदार प्रदीप नाईक हे आजही आपल्या मतदारसंघात प्रभावी असल्याचे त्यांच्या गांव भेटी सर्वेक्षणातून दिसून आल्याचा अनुभव कोमलदास भवरे यांनी सांगितला आहे.
15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांनी मतदारसंघातील तळागाळातील गरीब लोकांसाठी अनेक योजना आणल्या, त्या प्रभावीपणे राबविल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केलीत,सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे बांधले.साठवण तलाव त्यांच्याच काळात बांधले. असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांनी आपल्या मतदारसंघात कोणत्याही अवैध धंद्यांना कधीच थारा दिला नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अजूनही प्रदीप नाईक हेच आमदार म्हणून आहेत आणि येणार्या काळात ते नक्कीच लाल दिव्याच्या गाडीत बसतील आणि मतदार संघाचा आणखी विकास झपाट्याने करतील,अशी भावना जनसामान्यातून मोठया उत्साहाने व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीच्या ज्या जागा वाटपात शरद पवार गटाला मिळतीत त्यात टॉप 5 मध्ये माजी आमदार प्रदीप नाईक हे राहणारच.असे मा.आ.प्रदीप नाईक यांच्या सध्याच्या वातावरणातून दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जाणारा किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघ वगळला गेला ? मा.आ. नाईक यांच्या तुतारीचा पत्ता कट ? अशा उलट-सुलट स्वरुपाच्या बातम्या वृतपत्रात प्रकाशित झाल्या होत्या. परंतु माजी आमदार प्रदीप नाईक यांचा किनवट माहूर मतदार संघात गड अजूनही शाबूत आहे. ते जनतेच्या नेहमी चर्चेत आहेत. ते तीन टर्मचे आमदार होते आता चौथ्या टर्मचे ही आमदार तेच होतील, त्यांचा पत्ता कोणीही कट करू शकत नाही.त्यांची उमेदवारीच निश्चितच आहे आणि ते लवकरच आगामी काळात लाल दिव्याच्या गाडीत बसलेले दिसतील, असे सर्वत्र जनसामान्यात बोलले जात आहे.आजही माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या विषयी मतदार संघातील जनतेत आपुलकी कायम आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.आपकी बार प्रदीप नाईकच आमदार ही चर्चा सध्या मतदार संघात जोरात सुरू असल्याचे ऐकावयास मिळत आहे. हे विशेष.