former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या होर्डींग समोर ग्रामीण भागातील नागरीकांचा फोटो घेण्यासाठी आग्रह -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| माजी आमदार प्रदीप नाईक यांचे शहरासह ग्रामीण भागात 'आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? या आशयाचे फलक लावल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांचे चाहते मंडळी स्वतःहोऊन होर्डींग समोर उभे राहून फोटो घेण्याचा आग्रह करीत आहेत. आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर ग्रामीण जनता स्वतः नाईक साहेब किती चांगले आहेत हे खुद्द जनताच आपल्या तोंडून सांगत आहे.त्यामुळे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेच्या निवडणूका जस जशा जवळ येत तस तसे इच्छूक उमेदवारांनी खेडोपाडी, गाव,वाडी, तांड्यात बॅनर,होर्डींग्स लावले आहेत.परंतु प्रदीप नाईक यांच्या बॅनरला ग्रामीण भागातील जनता अधिक पसंती देतांना दिसत आहे. कोण निवडून येईल या बाबत गावातील चावडीवर, हॉटेल,पानटपर्यावर ग्रामीण भागातील नागरीक चर्चा करीत असून प्...
