नवीन नांदेड| 5 सप्टेंबर 24 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिडको केंद्रांतर्गत शाळातील सर्वच शिक्षकासह उत्कृष्ट कार्य करणारे व विद्यार्थ्यांना घडविण्यात ज्या शिक्षकांचे मोलाचे हातभार आहेत असे सर्व गुण संपन्न असे शिवकुमार पंतुलवार, दत्ता धोंडीबा शिंदे ,बालाजी कवटीकवार व सौ. धनश्री देशपांडे अशा चार शिक्षकांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
मौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायेगाव येथे सिडको केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब मटके यांच्या संकल्पनेतून व संयोजनातून केंद्रातील सर्वच शिक्षकांचा मान सन्मान व प्रेरणा देण्यासाठी केंद्रातील वरील चार शिक्षका सोबतच सर्व शिक्षकांना शाल पुष्पगुच्छ व हार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब मटके होते तर प्रमुख उपस्थिती नांदेड तालुक्याचे गटशिक्षण धिकारी नागराज बनसोडे साहेब तसेच सिडको बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी वेंकट पाटील आणि विशेष आकर्षण म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व बरड शेवाळा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे , यांचे मार्गदर्शन सर्व शिक्षकांना लाभले.
या कार्यक्रमास सिडको केंद्रातील भायेगाव शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कल्याणकर, बाभूळगाव शाळेचे मुख्याध्यापक सर्जे ,काकांडीचे मुख्याध्यापक दाऊद शेख,बळीराम रुद्रावाड, प्रकाश घोरबांड श्रीमती येतेजवार प्रकाश पेंडलवाड पंडित कांबळे नाईक ,इत्यादींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. कविता गरुडकर यांनी केले तर प्रास्ताविक मंगेश कोंडलवाडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन किक्कीचे मुख्याध्यापक काजी यांनी केले.