Homeलातूरशंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

लातूर। लातूर तालुक्यातील हरंगुळ बु.च्या कैलास नगर येथील श्री शंभू महादेव देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पवित्र अशा श्रावण मासारंभा निमित्त कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावड यात्रेमध्ये कैलास नगर, गोविंद नगर, माऊली नगर, मुक्ताईनगर व परिसरातील अनेक भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला होता.

ही कावड यात्रा कैलास नगर येथून वरवंटी शिवारात असलेल्या काशी नगर येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर काशी विश्र्वेश्वराला सर्व भाविक भक्तांनी कावडीत आणलेल्या पाण्याने जलाभिषेक केला. तसेच शिवनामाचा गजर करीत येथील भाविक भक्त शिवनामाच्या भजनात दंग झाले. ही कावड यात्रा काशीनगर येथून परत तेथील जल घेऊन कैलास नगर येथील श्री शंभू महादेवास भाविक भक्तांनी जलाभिषेक केला. या नंतर काशिनगर येथे सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात होते.

IMG 20240804 193240 शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

वेदांग धाराशिवे यांचे सुश्राव्य भजन वरवंटी शिवारात म्हणजे बार्शीरोडवरील परशुराम पार्कजवळ वडगावे फार्मस, काशिनगर येथील देवस्थानात पावन अशा श्रावण मासारंभानिमीत्त निमित्त प्रख्यात गायक सुरमणी वेदांग धाराशिवे यांचे सुश्राव्य असे भजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविक भक्त भक्तीसागरात बुडाले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments