Wednesday, May 13

Tag: Kavad Yatra on behalf

शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

धार्मिक, लातूर
लातूर। लातूर तालुक्यातील हरंगुळ बु.च्या कैलास नगर येथील श्री शंभू महादेव देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पवित्र अशा श्रावण मासारंभा निमित्त कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावड यात्रेमध्ये कैलास नगर, गोविंद नगर, माऊली नगर, मुक्ताईनगर व परिसरातील अनेक भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला होता. ही कावड यात्रा कैलास नगर येथून वरवंटी शिवारात असलेल्या काशी नगर येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर काशी विश्र्वेश्वराला सर्व भाविक भक्तांनी कावडीत आणलेल्या पाण्याने जलाभिषेक केला. तसेच शिवनामाचा गजर करीत येथील भाविक भक्त शिवनामाच्या भजनात दंग झाले. ही कावड यात्रा काशीनगर येथून परत तेथील जल घेऊन कैलास नगर येथील श्री शंभू महादेवास भाविक भक्तांनी जलाभिषेक केला. या नंतर काशिनगर येथे सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात होते. वेदांग धाराशिवे यांचे सु...
error: Content is protected !!