HomeनांदेडRevenue takes action : वाळू वाहतूक करणारे २ हायवा दहिकळंबा परिसरात पकडले;...

Revenue takes action : वाळू वाहतूक करणारे २ हायवा दहिकळंबा परिसरात पकडले; महसूलची कारवाई

उस्माननगर, माणिक भिसे| दहिकळंबा परिसरात वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे २ हायवा (2 sand transporters caught in Dahikalamba area; Revenue takes action) पकडण्यात आले. दि. ५ जुलै रोजी महसूल पथकाने ही कारवाई केली.

उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानूसार नायब तहसीलदार रेखा चामनर व त्यांच्या पथकाने दहिकळंबा परिसरात एमएच २० ईएल ८९६९ ही हायवा (मालक ज्ञानेश्वर भीमराव पांडुरणे) व एमएच २६ बीई ४०८७ ही दुसरी हायवा (मालक पांडुरंग माधवराव ढेपे, रा. मारतळा, ता. लोहा) विना परवाना वाळू वाहतूक करताना आढळून आल्या.

महसूल पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन त्यामधील अंदाजे ५ ब्रास वाळू जप्त करून पंचनामा करण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार रेखा चामनर, शिपाई शिवराज लघुळे व वाहनचालक मिर्झा समीर बेग यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. या दोन्ही हायवा उस्माननगर पो स्टेला येथे जमा करण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. या कारवाईमुळे परिसरात अवैध वाळू वाहतुकीस चाप बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments