नांदेड| अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना सर्वात आधी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लायन्सचा डबा पुरविल्यामुळे दिवसभर उपाशी असलेल्या पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.
गोदावरी काठावर असलेल्या नांदेड शहराला पुराने वेढले आहे.अनेक घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे स्थलांतरण करण्यात आले. सोमवारी चूल पेटलेली नसल्यामुळे सर्वजण उपाशी होते.संध्याकाळपर्यंत कोणतीही मदत मिळाली नव्हती. सर्वात आधी लायन्स परिवार मदतीसाठी धावून आला.गुडघ्यावर पाण्यात जाऊन श्रावस्ती नगर, शनी मंदिर परिसर या भागात वरण भात भाजी पोळी व बुंदीचा समावेश असलेले लायन्सचे डबे वाटप करण्यात आले.
यासाठी दिलीप ठाकूर, शिवाजीराव पाटील, सुरेश शर्मा, संतोष भारती, विलास वाडेकर, प्रसाद देशपांडे, सुबोध बोंबिलवार, मनीषा अग्रवाल, निशा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. पूर संपेपर्यंत लायन्सचा डबा वितरित करण्यात येणार आहे. आतापर्यंत माधव एकलारे यांनी ५००, धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर १००, ला.बलजीतकौर रामगडिया यांनी ५० डब्यासाठी देणगी दिली आहे.प्रत्येकी ४० डबे देणाऱ्यांमध्ये ला. ज्ञानेश्वर महाजन,ला. शिवाजीराव पाटील,ला. दिलीप मोदी,ला. रवी कडगे,ला. नरेश व्होरा,ला. दीपेश छेडा,ला.सुधाकर चौधरी,ला. राजेंद्र हुरणे ,वसंत आहिरे ,शिवाजीराव शिंदे,गजानन जोशी,अजय अग्रवाल ,पवनकुमार रमेशचंद्र सारडा,अग्रवाल जिल्हा महिला मंडळ,प्रगती निलपत्रेवार,शंकरराव कामीनवार ,डॉ. अरुण हिवरेकर ,सुधीर विष्णुपुरीकर यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी २० डबे ला. पारुल जैन, अग्रवाल महिला मंडळ नांदेड शहर, सुधाकर जबडे देगलूर यांनी दिले आहे. दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस वर्षात लोकसहभागातून बारा लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे वेळोवेळी वाटप करण्यात आले आहेत.
पूर ओसरे पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. हा उपक्रम सुरू असेपर्यंत अन्नदात्यांची यादी सोशल मीडियावर पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांपर्यंत वारंवार वायरल केली जाईल.यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी ९४२१८ ३९३३३ या नंबर वर गुगल पे अथवा फोन पे द्वारे ₹ २००० पाठवावे. अन्नदात्यांच्या हस्ते चार पोळी, भाजी वरण-भात असलेले ४० जेवणाचे डबे देण्यात येणार आहेत.तरी पूरग्रस्तांसाठी लायन्सचा डबा या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त दानशूर नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष ला. शिवाजीराव पाटील, सचिव ला. गौरव दंडवते, कोषाध्यक्ष ला.दिपेश छेडा, प्रोजेक्ट चेअरमन ला. धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.