किनवट, परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्वच अंगणवाड्यांमधून सहा महिने ते तीन वर्ष सर्वसाधारण बालके व सहा महिने ते तीन वर्षातील तीव्रतेने कमी वजनाच्या बालकांसाठी तसेच गरोदर माता आणि स्तनंदा मातांसाठी महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून पोषण आहार पुरवला जातो.


मात्र नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी अतिदुर्गम भागातील आप्पारापेठ अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये निकृष्ट , जाळी व किडे लागलेला आणि दुर्गंधीयुक्त पोषण आहार पुरवल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने पालकांनी हा निकृष्ट आणि दुर्गंधीयुक्त वाटप केलेला पोषण आहार येथील पालकांनी अंगणवाडीत वापस केला आहे.

महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असलेल्या अप्पारापेठ येथील अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये दिनांक 27 जून 2024 रोजी जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कडून गाडी क्रमांक एम एच 14 / 0650 या गाडी द्वारे एनर्जी डेन्स मुगदाळ खिचडी प्रिमिक्स 48 पाकीट, एनर्जी डेन्स जोरदार खिचडी प्रिमिक्स 48 पाकीट मल्टी मिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन्स प्रिमिक्स 48 पाकीट असे एकूण पोषण आहाराचे 144 पाकीट, गरोदर माता 2 स्तनंदा माता 2 व सहा महिने ते तीन वर्ष सर्वसाधारण बालके व तीन वर्षे ते सहा वर्ष तीव्र कमी वजनाच्या 20 बालकांसाठी हा पोषण आहार अंगणवाडीत देण्यात आला. एवढेच नव्हे तर याच पद्धतीचा माल संबंधित एजंसीकडून सर्व तालुका भरातील अंगणवाड्यांना वाटप करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.


हा पोषण आहार अंगणवाडीतील बालकांना वाटप करण्यात आला मात्र हा पोषण आहार जाळी किडे दुर्गंधीयुक्त पोषण आहार असल्याने पालकांनी हा पोषण आहार अंगणवाडी मध्ये वापस केला. असा हा दुर्गंधीयुक्त निकृष्ट दर्जाचा पोषण आहार जनावरे देखील खात नाहीत असा पोषण आहार बालकांसाठी पुरवला जात आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात बालकांचे व गरोदर माता व स्तंनदा मातांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी शासनाने चांगल्या दर्जाचा पोषण आहार द्यावा अशी मागणी येथील कौड यरन्ना,कौड योगेश, विलास सटललू, नुतूल भुमेश, मच्छरला दिलीप, कडतल लक्ष्मण, पालकांनी केली आहे.
