नांदेडकरियर

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नवीन नांदेड़ l नाशीक येथे 35 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नाशिक येथील गायकवाड सभागृहात दरवर्षी देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्यावतीने प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार नांदेड येथील सिडको भागातील अहिल्यादेवी महिला जेष्ठ नागरिक संघ अध्यक्षा भागीरथी मारोतराव बच्चेवार यांना राज्यस्तरीय प्रथम पारितोषक सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दर तिनं वर्षाला होणारे राज्यस्तरीय 35 वे जेष्ठ अधिवेशन नाशिक येथील गायकवाड सभागृहात 8 व 9 मार्च रोजी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व जेष्ठ नागरिक संघटनेचे राज्य अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष अशोक तेरकर, महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष डॉ. निर्मला कोरे,सचिव महामुने , माजी सचिव जयवंत सोमवाड ,सुनिता तेरकर यांच्या सह उतर मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ.हंसराज वैध,राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अधिवेशना पुर्वी अहिल्यादेवी महिला जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने गेल्या वर्षभरापासून आरोग्य शिबिर, यांच्या सह जेष्ठ नागरिक मेळावा,ओळख पत्र वाटप यासह अनेक कामे केली व प्रस्ताव राज्यस्तरीय संघटने कडे पाठविण्यात आले होते.

उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन राज्यस्तरीय अधिवेशन मध्ये अहिल्यादेवी महिला जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा भागिरथी बच्चेवार यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ नागरिक महिला व जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!