CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
नवीन नांदेड़ l नाशीक येथे 35 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नाशिक येथील गायकवाड सभागृहात दरवर्षी देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्यावतीने प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार नांदेड येथील सिडको भागातील अहिल्यादेवी महिला जेष्ठ नागरिक संघ अध्यक्षा भागीरथी मारोतराव बच्चेवार यांना राज्यस्तरीय प्रथम पारितोषक सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दर तिनं वर्षाला होणारे राज्यस्तरीय 35 वे जेष्ठ अधिवेशन नाशिक येथील गायकवाड सभागृहात 8 व 9 मार्च रोजी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व जेष्ठ नागरिक संघटनेचे राज्य अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष अशोक तेरकर, महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष डॉ. निर्मला कोरे,सचिव महामुने , माजी सचिव जयवंत सोमवाड ,सुनिता तेरकर यांच्या सह उतर मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ.हंसराज वैध,राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प...
