Homeनांदेडनांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी...

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड l पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी संयुक्तरित्या कारवाई करुन जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघड करुन एकुण 1,10,000/- रुपयेचा मुद्देमाल केला जप्त केला असुन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तपास करणाऱ्या पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 04 मार्च 26 रोजी वेळ रात्री 02 वाजताचे सुमारास माणिका नागोबा इनकर रा.गंगाबेट ता. जि. नांदेड यांच्या शेतातील आखाड्यावर दोन अनोळखी इसम तोंड बांधुन हातात कत्ते व रॉड घेवून 1) द्रोपदाबाई पि.माणिकराव इनकर वय 65 वर्ष, 2) माणिका नागोबा इनकर वय 90 वर्ष दोघे रा.गंगाबेट ता.जि.नांदेड यांना झोपेतून उठवुन लाथाबुक्यानी, कत्याने व रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

तसेच द्रोपदाबाई पि. माणिकराव इनकर यांच्या हातातील चांदीच्या पाटल्या व पायातील चांदीचे वाळे असे चांदीचे दागीने किंमती एकुण 1,10,000/- रुपयेचा मुद्देमाल जबरीने घेवुन गेले वगैरे फिर्याद वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी मोजे गंगाबेट येथे भेट देवून सुचना व मार्गदर्शन करुन, सदर मालाविरुध्दचा दाखल गुन्हा उघड करणे बाबत आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार हे दोन अनोळखी इसमाचा शोध घेत असताना तपासाचे चक्रे फिरवुन गोपनीय माहितीचे आधारे मौजे विरेगांव ता.जि. जालना येथुन रवि उर्फ मुंडल भास्कर शिंदे वय 20 वर्ष, रा. विरेगांव ता.जि. जालना यास अत्यंत शिताफीने व सायबर सेलच्या मदतीने ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करुन त्याचे ताब्यातुन वर नमूद चांदीचे दागीने हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघड केला आहे.

सदर गुन्हयातील दुसरा आरोपी नामे भास्कर सायबा शिंदे, वय 55 वर्ष, रा.विरेगांव ता.जि.जालना यास वरील नमुद स्था.गु.शा.नांदेड येथील पोलोस अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेवुन पो.स्टे. नांदेड ग्रा. येथे हजर केले. सदर दोन्ही आरोपीतांना कडुन नमुद प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन्ही आरोपीतांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. आरोपीतांना न्यायालयात पोलीस कोठडी कामी हजर करण्यात आले असुन, सदर गुन्हयाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक. विजयकुमार कांबळे हे करीत आहेत. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा व गेला मुद्देमालाचा शोध घेणेकामी नांदेड ग्रामीण येथील तिनं टिम व स्थागुशा, नांदेड येथील एक टिम यांनी कामकाज केले आहे.

सदरची उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक करुन, अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments