नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
नवीन नांदेड l पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी संयुक्तरित्या कारवाई करुन जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघड करुन एकुण 1,10,000/- रुपयेचा मुद्देमाल केला जप्त केला असुन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तपास करणाऱ्या पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 04 मार्च 26 रोजी वेळ रात्री 02 वाजताचे सुमारास माणिका नागोबा इनकर रा.गंगाबेट ता. जि. नांदेड यांच्या शेतातील आखाड्यावर दोन अनोळखी इसम तोंड बांधुन हातात कत्ते व रॉड घेवून 1) द्रोपदाबाई पि.माणिकराव इनकर वय 65 वर्ष, 2) माणिका नागोबा इनकर वय 90 वर्ष दोघे रा.गंगाबेट ता.जि.नांदेड यांना झोपेतून उठवुन लाथाबुक्यानी, कत्याने व रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
तसेच द्रोपदाबाई पि. माणिकराव इनकर यांच्या हातातील चांदीच्या पाटल्या व पायातील चांदीचे वाळे असे चांदीचे दागीने किंमती एकुण 1,10...
