Meenal karanwal : 20 नोव्हेंबरच्याा लोकशाहीच्या एसटीमध्ये सर्वांनी स्वार व्हा ! -NNL

नांदेड| प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, बसस्थांनकावरील फलाट क्रमांक 1 वर ई-20 लोकशाहीची गाडी लागली आहे आपण सर्वांनी या लोकशाही गाडीमध्ये बसून प्रवास करावा. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजवावा अशी उद्घोषणा नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी नांदेड बस स्थानकावर केली.

गाडी अमूक या गावाला जाणार असल्याची नेहमीची सूचना ऐकण्याची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्या बसमध्ये बसताना मतदानाची तिकिट काढण्यासाठी, आपल्याच पसंतीच्या उमेदवाराला 20 नोव्हेंबरला मतदान करण्याजसाठी विसरु नका ! असे आवाहन केले.

यावेळी लोकशाही जनजागृतीच्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटनही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. नांदेड जिल्हाकधिकारी तथा जिल्हाे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्‍या मार्गदर्शनात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम राबविण्याशत येत आहेत. त्यावला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आजच्या बसस्थानकावरील उपक्रमामध्ये एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन खान, शंकरराव नांदेडकर, कृष्णा उमरीकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, रामचंद्र पाचंगे, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, प्रलोभ कुलकणी, हनुमंत पोकळे, सुनील मुत्तेपवार, अवधूत गंजेवार, माणिक भोसले, संभाजी पोकळे, सुनील दाचावार, संजय भालके आदींचा समावेश होता.
०००००

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button