Meenal karanwal : 20 नोव्हेंबरच्याा लोकशाहीच्या एसटीमध्ये सर्वांनी स्वार व्हा ! -NNL
नांदेड| प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, बसस्थांनकावरील फलाट क्रमांक 1 वर ई-20 लोकशाहीची गाडी लागली आहे आपण सर्वांनी या लोकशाही गाडीमध्ये बसून प्रवास करावा. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजवावा अशी उद्घोषणा नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी नांदेड बस स्थानकावर केली.
गाडी अमूक या गावाला जाणार असल्याची नेहमीची सूचना ऐकण्याची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्या बसमध्ये बसताना मतदानाची तिकिट काढण्यासाठी, आपल्याच पसंतीच्या उमेदवाराला 20 नोव्हेंबरला मतदान करण्याजसाठी विसरु नका ! असे आवाहन केले.
यावेळी लोकशाही जनजागृतीच्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटनही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन मतदान करण्याचे आवा...
